शास्त्रामध्ये उल्लेख आहे की, 8 लोकांना चिरंजीवी म्हणजे अमर होण्याचे वरदान आहे. यामध्ये भगवान हनुमान हे आहेत. प्रभू श्रीराम आणि देवी सीतेचे वरदान मिळाल्यामुळे हनुमान अमर आहेत. मान्यतेनुसार कैलाश पर्वतावर उत्तर दिशेला आणखी एक खास ठिकाण आहे, जेथे हनुमान आजही निवास करतात.
गंधमादन पर्वतावर राहतात हनुमान
पुराणांनुसार, कलियुगात हनुमान गंधमादन पर्वतावर निवास करतात. एका कथेनुसार, पांडव अज्ञातवास कामध्ये हिमवंत पर्वत पार करून गंधमादन पर्वतावर पोहोचले होते. त्यावेळी भीम सहस्त्रदल कमळ घेण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेले आणि त्याठिकाणी हनुमानाने वृद्ध वानराचे रूप घेऊन भीमाचे गर्वहरण केले होते.