आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरणीय गणपती बाप्पा, मी MA पास झालेय, वाचा भक्तांचे इंट्रेस्टिंग लेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्ण देशामध्ये उत्साहात गणेशोत्सोव साजरा केला जातोय. इंदोर येथील 2000 वर्ष जुन्या चिंतामनी गणपतीचेही अनेक भक्त आहेत. काही भक्त तर सातासमुद्रापलिकडील आहेत. हे भक्त आपल्या आराध्याचे दर्शन आणि आपल्या इच्छा घेऊन येथे पोहोचत आहेत. परंतु जे पोहोचू शकत नाही ते लेटरच्या माध्यमातून आपल्या इच्छा देवाला सांगत आहेत. काही मोबाइलने गणपतीचे दर्शन घेत आहेत.

- पुजारी मनोहर पाठक यांनी सांगितले की, इंदौरचे प्राचीन मंदिर जवळपास 2000 वर्ष प्राचिन आहे. या मंदिराची स्थापना परमार राजांनी केली होती. पौराणिक कथांनुसार औरंगजेब हे मंदिर हटवण्यासाठी येथे आला होता. परंतु जेव्हा त्याने दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला तेव्हा गणपतीचा चमत्कार पाहून चकीत झाला. गणपतीचे हे रुप पाहून त्याने येथे डोके टेकले आणि उलट्या पायाने परतला.

- भक्तांचे कष्ट दूर करणा-या जूनी मंदिर चिंतामनी गणेशाचे नाव आता बदलले आहे. या गणपतीला लोक आता चिठ्ठीवाला गणेश किंवा मोबाइल गणेशाच्या नावाने ओळखू लागले आहेत. कारण या गणपतीचे भक्त देशा-विदेशात आहेत. यामुळे लोक विदेशांतून येथे येतात. येथे येऊ न शकल्यास मोबाइलवरुन दर्शन घेतात. अनेक भक्त आपल्या इच्छांची चिठ्ठी या गणपतीपर्यंत पोहोचवतात. 
 
अशी सरु झाली चिठ्ठीची पध्दत
- सर्वात अगोदर एका गरीब तरुणाने गणपतीला चिठ्ठी पाठवली. त्यामध्ये त्याने लिहिले की, बाप्पा मी तुम्हाला सव्वा किलो लाडू अर्पण करु शकेल येवढे सक्षम मला बनवा. देवाने या निर्धन भक्ताचे ऐकले आहे त्याला लाडू अर्पण करण्यास सक्षम बनवले. तो भक्त लाडू घेऊन इंदौरला आला. तेव्हापासून प्रत्येक भक्त बाप्पांना चिठ्ठी पाठवतो.

- बाहेर राहणारे भक्त हे पुजारी मनोहर लाल पाठकला कॉल करुन गणपतीचे दर्शन घेतात. यासोबतच वेळोवेळी लोक आपल्या चिंता गणपतीला पाठवतात. चिंता दूर झाल्यानंतर लेटर द्वारे धन्यवाद पाठवतात. पुजारीनुसार गणपती बाप्पांना देश नाही तर विदेशातूनही चिठ्ठ्या येतात. आतापर्यंत अमेरिका, दुबई, मक्का, नेपाळ, रुस, जर्मनी, जापान सारख्या अनेक देशांमधून भक्ताच्या चिठ्ठ्या आल्या आहेत. देशाविदेशातील अनेक भक्त फोनव्दारे गणपतीचे दर्शन घेतात. त्यांना इच्छा व्यक्त करायची असते तेव्हा आम्ही गणपती जवळ फोन ठेवतो. मग ते आपल्या इच्छा गणपतीला सांगून देतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...