एकाच ठिकाणी विराजित / एकाच ठिकाणी विराजित असलेले डाव्या-उजव्या सोंडेचे भारतातील एकमेव गणेश मंदिर

अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. आपणा सर्वांना माहिती असलेल्या अष्टविनायक यात्रेप्रमाणेच काही गणेशस्थाने मराठवाडा भागामध्ये असून गणेशभक्तांना तेवढ्याच तोलामोलाची वाटतात. ही सर्व गणेशस्थानेही प्राचीन असून येथेही विविध देवतांनी, ऋषींनी गणेशाची उपासना केल्याचे आढळते. मराठवाड्यातील अष्टविनायकाच्या स्थानांना मोठी पौराणिक पूर्वपीठिका असून ती गणेशभक्तांची आवडती श्रद्घास्थाने आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या खास गणेश मंदिरांची माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणती आहेत हे खास गणेश स्थान...

जीवनमंत्र डेस्क

Aug 25,2017 02:23:00 PM IST
अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे.

आपणा सर्वांना माहिती असलेल्या अष्टविनायक यात्रेप्रमाणेच काही गणेशस्थाने मराठवाडा भागामध्ये असून गणेशभक्तांना तेवढ्याच तोलामोलाची वाटतात. ही सर्व गणेशस्थानेही प्राचीन असून येथेही विविध देवतांनी, ऋषींनी गणेशाची उपासना केल्याचे आढळते. मराठवाड्यातील अष्टविनायकाच्या स्थानांना मोठी पौराणिक पूर्वपीठिका असून ती गणेशभक्तांची आवडती श्रद्घास्थाने आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या खास गणेश मंदिरांची माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणती आहेत हे खास गणेश स्थान...
१) लक्षविनायक - तारकासुराचा वध करण्यासाठी शंकर-पार्वतींचा पुत्र स्कंद (कार्तिकेय) याने सर्व देवांचा सेनापती म्हणून येथे गणेशाची उपासना केली. हे स्थान औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथे आहे.२) आशापूरकगणेश (अमलाश्रमक्षेत्र) - बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील हे स्थान अतिशय प्रसिद्घ क्षेत्र मानले जाते. या ठिकाणी भृशुंडी ऋषींनी गणेशाची उपासना केली. आपल्या उत्कट भक्तीच्या जोरावर श्री भृशुंडी ऋषींना गणेशासारखी सोंड प्राप्त झाली व त्यांना प्रतिगणेश संबोधले जाऊ लागले.याच क्षेत्री यम शापमुक्त झाला. त्याने आशापुरक गणेशाची स्थापना केली.३) प्रवाळ व धरणीधर गणेश - याच तीर्थक्षेत्री कार्तवीर्य राजाने गणेशाची तपश्चर्या करून प्रवाल गणेश या गणेशमूतीर्ची स्थापना केली. तसेच अखिल नागांचा सम्राट सहस्त्रफणाधारी महाशेष याने पृथ्वीधारण करण्याचे सार्मथ्य व सर्व प्रकारचे योगवैभव मिळविण्याकरीता याच ठिकाणी गणेशाची आराधना केली. त्याने धरणीधर गणेश नावाने दुसरी गणेशमूतीर् स्थापन केली. हे क्षेत्र पद्मालय क्षेत्र म्हणून प्रसिद्घ असून एरंडोल (जळगाव) जवळ आहे. गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी हे एक पीठ आहे.४) दैत्यविमर्दनगणेश - (श्रीक्षेत्र राजूर) - सिंधुरासुराचा वध केल्यानंतर सर्व देवांनी व वरेण्यराजाने मिळून या राजसदनक्षेत्री या गणपतीची स्थापना केली. येथेच गजाननाने वरेण्याला गणेशगीता सांगितली. हे स्थान जालन्याजवळ असून गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.५) लिंबागणेश, बीड - चंद्राने गणपतीची उपहासात्मक हास्याने निंदा केली. त्यावेळी गणेशाने दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रासाठी सर्व देवतांनी लिंबागणेश या क्षेत्री गणेशाची उपासना केली आणि गणेशाची मुर्ती स्थापन केली. त्या गणेशाला भालचंद्र असे म्हणतात. याच ठिकाणी गणेशाने लिंबासुर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या गावाला लिंबागणेश असे म्हणतात.६) भालचंद्र गणेश - (गंगामासला) - शापमुक्तीसाठी चंदाने केलेल्या गणेशाच्या ध्यानधारणेमुळे गणेश संतुष्ट झाला. चंदाने केलेल्या विनंतीनुसार गणेशाने चंदाला आपल्या भाळी धारण केले व संकष्टी चतुथीर्ला तुला प्रथम अर्घ्य देऊन गणेशभक्त माझी पूजा करतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा चंदाने देवब्राह्माणादिकांसह या गणेशाची स्थापना केली.७) विज्ञानगणेश (श्रीक्षेत्र राक्षसभुवन) जालन्याजवळ श्रीदत्तात्रेयांनी गणेश उपासना करून स्वानंद समाधिसुखाचा अनुभव घेतला. गणेशाची येथे आत्मनिवेदन भक्ती केली. त्यामुळे त्यांना गणेशदर्शन घडले व गणेशाची कृपा त्यांनी संपादित केली. गुरू संप्रदायानुसार येथे त्यांनी श्री विज्ञान गणेशाची स्थापना केली आणि उपासना करून वास्तव्य केले. सूर्यपुत्र शनीनेही येथे उपासना केली आहे.८) नवगणपती (नवगणराजूरी, बीड) येथील मंदिरात एका चौकोनी दगडावर एकमेकांकडे पाठ केलेले एकाच शिळेत चार गणपती आहेत. पूर्वेकडे मुख असलेला महामंगल, पश्चिमाभिमुख शेषाब्धिष्ठित, दक्षिणाभिमुख मयूरेश्वर आणि उत्तराभिमुख उतीष्ट हे चार गणपती. या मुर्तीवर वेगवेगळ्या आसनात अंदाजे पावणेचार फूट उंचीच्या आहेत. हे पेशवेकालीन मंदिर असून मंदिरात पाच व गावाच्या चार वेशींवर चार गणपती आहेत म्हणून या स्थानाला नवगणराजूरी म्हणतात.या गणेशाची स्थापना ब्रम्हदेवाने केली आहे.

१) लक्षविनायक - तारकासुराचा वध करण्यासाठी शंकर-पार्वतींचा पुत्र स्कंद (कार्तिकेय) याने सर्व देवांचा सेनापती म्हणून येथे गणेशाची उपासना केली. हे स्थान औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथे आहे.

२) आशापूरकगणेश (अमलाश्रमक्षेत्र) - बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील हे स्थान अतिशय प्रसिद्घ क्षेत्र मानले जाते. या ठिकाणी भृशुंडी ऋषींनी गणेशाची उपासना केली. आपल्या उत्कट भक्तीच्या जोरावर श्री भृशुंडी ऋषींना गणेशासारखी सोंड प्राप्त झाली व त्यांना प्रतिगणेश संबोधले जाऊ लागले.याच क्षेत्री यम शापमुक्त झाला. त्याने आशापुरक गणेशाची स्थापना केली.

३) प्रवाळ व धरणीधर गणेश - याच तीर्थक्षेत्री कार्तवीर्य राजाने गणेशाची तपश्चर्या करून प्रवाल गणेश या गणेशमूतीर्ची स्थापना केली. तसेच अखिल नागांचा सम्राट सहस्त्रफणाधारी महाशेष याने पृथ्वीधारण करण्याचे सार्मथ्य व सर्व प्रकारचे योगवैभव मिळविण्याकरीता याच ठिकाणी गणेशाची आराधना केली. त्याने धरणीधर गणेश नावाने दुसरी गणेशमूतीर् स्थापन केली. हे क्षेत्र पद्मालय क्षेत्र म्हणून प्रसिद्घ असून एरंडोल (जळगाव) जवळ आहे. गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी हे एक पीठ आहे.

४) दैत्यविमर्दनगणेश - (श्रीक्षेत्र राजूर) - सिंधुरासुराचा वध केल्यानंतर सर्व देवांनी व वरेण्यराजाने मिळून या राजसदनक्षेत्री या गणपतीची स्थापना केली. येथेच गजाननाने वरेण्याला गणेशगीता सांगितली. हे स्थान जालन्याजवळ असून गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.

५) लिंबागणेश, बीड - चंद्राने गणपतीची उपहासात्मक हास्याने निंदा केली. त्यावेळी गणेशाने दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रासाठी सर्व देवतांनी लिंबागणेश या क्षेत्री गणेशाची उपासना केली आणि गणेशाची मुर्ती स्थापन केली. त्या गणेशाला भालचंद्र असे म्हणतात. याच ठिकाणी गणेशाने लिंबासुर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या गावाला लिंबागणेश असे म्हणतात.

६) भालचंद्र गणेश - (गंगामासला) - शापमुक्तीसाठी चंदाने केलेल्या गणेशाच्या ध्यानधारणेमुळे गणेश संतुष्ट झाला. चंदाने केलेल्या विनंतीनुसार गणेशाने चंदाला आपल्या भाळी धारण केले व संकष्टी चतुथीर्ला तुला प्रथम अर्घ्य देऊन गणेशभक्त माझी पूजा करतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा चंदाने देवब्राह्माणादिकांसह या गणेशाची स्थापना केली.

७) विज्ञानगणेश (श्रीक्षेत्र राक्षसभुवन) जालन्याजवळ श्रीदत्तात्रेयांनी गणेश उपासना करून स्वानंद समाधिसुखाचा अनुभव घेतला. गणेशाची येथे आत्मनिवेदन भक्ती केली. त्यामुळे त्यांना गणेशदर्शन घडले व गणेशाची कृपा त्यांनी संपादित केली. गुरू संप्रदायानुसार येथे त्यांनी श्री विज्ञान गणेशाची स्थापना केली आणि उपासना करून वास्तव्य केले. सूर्यपुत्र शनीनेही येथे उपासना केली आहे.

८) नवगणपती (नवगणराजूरी, बीड) येथील मंदिरात एका चौकोनी दगडावर एकमेकांकडे पाठ केलेले एकाच शिळेत चार गणपती आहेत. पूर्वेकडे मुख असलेला महामंगल, पश्चिमाभिमुख शेषाब्धिष्ठित, दक्षिणाभिमुख मयूरेश्वर आणि उत्तराभिमुख उतीष्ट हे चार गणपती. या मुर्तीवर वेगवेगळ्या आसनात अंदाजे पावणेचार फूट उंचीच्या आहेत. हे पेशवेकालीन मंदिर असून मंदिरात पाच व गावाच्या चार वेशींवर चार गणपती आहेत म्हणून या स्थानाला नवगणराजूरी म्हणतात.या गणेशाची स्थापना ब्रम्हदेवाने केली आहे.
X
COMMENT