100 कोटींचे दागिने / 100 कोटींचे दागिने घालतात हे राधा-कृष्ण, सुरक्षेत तैनात असतात हत्यारबंद गार्ड

सिंधिया राजघराण्याने फुलबाग परिसरात गोपाळ मंदिराचे निर्माण केले असून यामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Aug 14,2017 04:22:00 PM IST
ग्वालियर : सिंधिया राजघराण्याने फुलबाग परिसरात गोपाळ मंदिराचे निर्माण केले असून यामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित आहे. राधा-कृष्णाच्या या मूर्तीला बहुमूल्य रत्नजडित दागिन्यांनी सजवले जाते. देश स्वतंत्र झाल्यानंतर आता हे दागिने बँक लॉकरमध्ये आहेत. 10 वर्षांपूर्वी स्थानिक लोकांच्या विनंतीवरून जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने या मुर्तीला घालण्याची प्रथा सुरु झाली आहे. प्राचीन असलेल्या या दागिन्यांची किंमत 100 कोटीच्या घरात आहे. राधा-कृष्णाच्या मूर्तीला दागिने घातल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी हत्यारबंद गार्ड तैनात असतात. 15 ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला ग्वालियरच्या गोपाळ मंदिरातील राधा-कृष्णाच्या ज्वेलरीची माहिती देत आहोत.

असे आहेत राधा-कृष्णाचे दागिने
- हे दागिने शुद्ध सोन्यापासून बनवण्यात आले आहेत. या दागिन्यांवर हिरे, मोती जडलेले आहे.
- दोन हार (एक 7 पदरी आणि एक 5 पदरी), सोन्याच्या बांगड्या, या व्यतिरिक्त रत्नजडित मुकुट.
- 10 चांदीचे ताट, ग्लास, समयी, फुलदाणी, प्रसाद पात्र. संपूर्ण दागिन्यांमध्ये माणिक, पन्ना, मोती, हिरे इ. रत्न जडलेले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, बहुमूल्य असलेल्या या दागिन्यांचे खास फोटो...
जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने राधा-कृष्णाच्या मुर्तीला घातले जातात.पन्ना व मोती हार.शुद्ध सोन्याचा मुकुट.राधा-कृष्णाचे आभूषणभगवान श्रीकृष्णाचे सोन्याचे कडेमुकुटहिरे-मोती जाडीत मुकुटचांदीचे भांडेसध्या हे दागिने बँक लॉकरमध्ये आहेत

जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने राधा-कृष्णाच्या मुर्तीला घातले जातात.

पन्ना व मोती हार.

शुद्ध सोन्याचा मुकुट.

राधा-कृष्णाचे आभूषण

भगवान श्रीकृष्णाचे सोन्याचे कडे

मुकुट

हिरे-मोती जाडीत मुकुट

चांदीचे भांडे

सध्या हे दागिने बँक लॉकरमध्ये आहेत
X
COMMENT