आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Even The God Is Untouchable, You Will Be Shoked On Hearing The Reason Behind This

येथे प्रेमी युगुलाच्या मिलनाची शिक्षा भोगत आहेत देव, आता अशी आहे मंदिराची अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 कोरिया : प्रेमी जोडपे मंदिरात लपूनछपून भेटण्याची शिक्षा येथील देवाला भोगावी लागत आहे. छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील या मंदिरात मागील 25 वर्षांपासून लोक जात नाहीत आणि देवाची पूजाही करत नाहीत. 60 वर्ष जुन्या या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती अस्ताव्यस्त पडल्या आहेत.

अंधश्रद्धेमुळे होत आहे हे सर्वकाही
- ही घटना कोरिया जिल्ह्यातील चिरमिरी तहसील हद्दीतील साजापहाड गावातील आहे. येथे 60 वर्ष जुने मंदिर मागील 25 वर्षांपासून बंद आहे.
- कोणीही मंदिरात जात नाही. मंदिर अपवित्र झाल्याचे सर्वांचे मत आहे. येथे पूजा केल्यास काहीतरी अनिष्ट घडणार अशी सर्वांना भीती आहे.
- कधीकधी या मंदिरात विधिव्रत पूजा आणि दोन वेळेस आरती होत होती. साजापहाड गावातील रामनारायण ठाकूर येथे पूजा करत होते.
- महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी भक्त येत होते. परंतु आता मंदिरातच नाही तर लोक मंदिराच्या जवळपासही जाण्यास घाबरतात.

यामुळे अपवित्र मानले जाते मंदिर
- स्थानिक लोकांच्या माहितीनुसार 25 वर्षांपूर्वी या मंदिरात एका प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीमध्ये पकडले होते.
- त्यानंतर गावातील वृद्ध मंडीळीची बैठक झाली आणि यामध्ये रामनारायण थरकून यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराला अशुभ तसेच विराजित मूर्तींना अपवित्र मानण्याचा निर्णय घेण्यात आला.
- तेव्हापासून या मंदिरात पूजा-अर्चना बंद आहे. मंदिरामध्ये आजही शिवलिंग, त्रिशूल जीर्ण अवस्थेत आहे. या व्यतिरिक्त येथे देवी-देवतांच्या मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत.

तरुणांचा पुढाकार परंतु वृद्ध मंडळी मानण्यास तयार नाही..
- चिरमिरी येथील काही तरुणांनी लोकांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मंदिरात पूजा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
- तरुणांनी मंदिराचे दरवाजे उघडले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु वृद्ध मंडळींनी याला नकार दिला.
- मंदिराच्या स्वच्छतेमध्ये कोणीही मदत केली नाही. आता पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि रूढीगत मान्यतांमुळे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे.

फोटो : अमित पांडेय

पुढील स्लाईड्सवर पाहा, या मंदिराचे इतर काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...