येथे स्वतः गंगा / येथे स्वतः गंगा करते महादेवाचा अभिषेक, आजपर्यंत उलगडले नाही हे रहस्य

जीवनमंत्र डेस्क

Dec 03,2017 12:05:00 AM IST

प्रत्येक मंदिराचे स्वतःचे एक खास महत्त्व आणि रहस्य असते. जगभरात महादेवाचे अनेक मंदिरे रहस्यमयी आणि चमत्कारिक आहेत. अनेक मंदिरांचे रहस्य आजही भक्तांसाठी आश्चर्यचकित करणारे आहेत. याच मंदिरांमधील महादेवाचे एक मंदिर आहे 'टूटी झरना' मंदिर.


महादेवाचे हे 'टूटी झरना' नावाचे मंदिर रामगढ (झारखंड) पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. महादेवाला समर्पित असलेले हे मंदिर अत्यंत अद्भुत आहे कारण येथे शिवलिंगाला जलाभिषेक इतर कोणी नाही तर स्वतः देवी गंगा करते. प्राचीन काळापासून देवी गंगा निरंतर या शिवलिंगावर जलधारा अर्पण करत आहे.


या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

स्थानिक मान्यतेनुसार, देशात इंग्रजांच्या शासन काळात खोदकाम करताना त्यांना हे शिवलिंग दिसले. शिवलिंगाच्या ठीक वरच्या बाजूला देवी गंगेची मूर्ती स्थित होती. या मूर्तीच्या नाभीतून एक जलधारा निघत होती. ती जलधारा गंगेच्या नाभीतून निघून त्यांच्याच हातामधून प्रवाहित होत शिवलिंगाला जलाभिषेक करत होती. त्या दिवसापासून आजपर्यंत देवी गंगा आणि महादेवाची मूर्ती येथेच विराजमान आहे. यामुळे देवी गंगा स्वतः महादेवाला अभिषेक करत असल्याचे मानले जाते.केव्हा जावे - टूटी झरना मंदिरात जाण्यासाठी वर्षातील कोणताही काळ उत्तम आहे.कसे पोहोचाल विमान मार्ग - रामगढपासून जवळपास 31 किलोमीटरवर रांची विमानतळ आहे. विमानाने रांचीपर्यंत आल्यानंतर तेथून रामगढला जाण्यासाठी बसची व्यवस्था उपलब्ध आहे. रेल्वे मार्ग - देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरातून रामगढपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. रामगढपासून वाहनाने टूटी झरना मंदिरापर्यंत जाने शक्य आहे.टूटी झरना मंदिराच्या जवळपास पाहण्यासारखे ठिकाण रजरप्पा मंदिर - रामगढपासून 28 किलोमीटरवर छिन्मस्तिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण देवी छिन्मस्तिकाची शीर नसलेली मूर्ती आहे.मायातुंग मंदिर - हे मंदिर रामगढपासून 5 किलोमीटरवर चुटुपालु पर्वतावर स्थित आहे. या मंदिरात लोक पूजा करून देवाकडे पावसासाठी प्रार्थना करतात.दुर्दुरीय तलाव - रामगढपासून 4 किलोमीटर अंतरावर दुर्दुरीय नावाचा सुंदर तलाव आहे.

स्थानिक मान्यतेनुसार, देशात इंग्रजांच्या शासन काळात खोदकाम करताना त्यांना हे शिवलिंग दिसले. शिवलिंगाच्या ठीक वरच्या बाजूला देवी गंगेची मूर्ती स्थित होती. या मूर्तीच्या नाभीतून एक जलधारा निघत होती. ती जलधारा गंगेच्या नाभीतून निघून त्यांच्याच हातामधून प्रवाहित होत शिवलिंगाला जलाभिषेक करत होती. त्या दिवसापासून आजपर्यंत देवी गंगा आणि महादेवाची मूर्ती येथेच विराजमान आहे. यामुळे देवी गंगा स्वतः महादेवाला अभिषेक करत असल्याचे मानले जाते.

केव्हा जावे - टूटी झरना मंदिरात जाण्यासाठी वर्षातील कोणताही काळ उत्तम आहे.

कसे पोहोचाल विमान मार्ग - रामगढपासून जवळपास 31 किलोमीटरवर रांची विमानतळ आहे. विमानाने रांचीपर्यंत आल्यानंतर तेथून रामगढला जाण्यासाठी बसची व्यवस्था उपलब्ध आहे. रेल्वे मार्ग - देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरातून रामगढपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. रामगढपासून वाहनाने टूटी झरना मंदिरापर्यंत जाने शक्य आहे.

टूटी झरना मंदिराच्या जवळपास पाहण्यासारखे ठिकाण रजरप्पा मंदिर - रामगढपासून 28 किलोमीटरवर छिन्मस्तिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण देवी छिन्मस्तिकाची शीर नसलेली मूर्ती आहे.

मायातुंग मंदिर - हे मंदिर रामगढपासून 5 किलोमीटरवर चुटुपालु पर्वतावर स्थित आहे. या मंदिरात लोक पूजा करून देवाकडे पावसासाठी प्रार्थना करतात.

दुर्दुरीय तलाव - रामगढपासून 4 किलोमीटर अंतरावर दुर्दुरीय नावाचा सुंदर तलाव आहे.
X
COMMENT