खजुराहो मंदिरावर का / खजुराहो मंदिरावर का कोरण्यात आल्या कामुक मूर्ती, या आहेत 4 मान्यता

Oct 27,2017 10:09:00 AM IST
आपल्या अनोख्या सौदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहो येथील मंदिरावर मोठ्या प्रमाणात कामुक मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. 950 ते 1050 दरम्यान या मुर्ती कोरण्यात आल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. या मागील नेमका हेतू काय? यावर अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे मत व्यक्त केले आहेत.

पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा खजुराहो येथील मंदीरावरील इरॉटिक मुर्ती आणि त्यामागील समज... फोटो आणि व्हिडिओ....
काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्राचीन काळात राजे-महाराजे हे जास्त वेळ भोगविलासात राहात होते. त्यामुळे त्यांनी या मुर्ती बनवल्या.काही तज्ज्ञांनुसार त्या काळात सेक्सविषयी मोकळे बोलले जात होते. त्यामुळे मंदिरावर अशा मुर्ती कोरूण्यात आल्या. मंदिरात मोठ्या प्रमाणात लोक जातात. त्यांना सेक्सचे योग्य शिक्षण मिळावे हा उद्देश होता.काहींच्या मते मोक्षप्राप्तीसाठी धर्म, अर्थ, योग आणि काम यातून जावे लागते. त्यामुळे देवाला शरण जाण्यासाठी मंदिरावर या मुर्ती कोरण्यात आल्या आहेत.काही तज्ज्ञांच्या मते धर्म वाढवण्यासाठी आणि लोकांना मंदिराकडे आकर्षित करण्यासाठी या मुर्ती कोरण्यात आल्या.मंदिरावर मोठ्या संखेने नग्न मुर्ती कोरण्यात आलेल्या आहेत.
X