विशेष : तारकासुर / विशेष : तारकासुर वधापूर्वी शिवपुत्र कार्तिकेयने स्थापन केलेला हा आहे 'लक्षविनायक'

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळात आराध्य दैवत श्री गणेशाचे पुरातन देवालय आहे. तारकासुर या दैत्याचा वध करताना स्वामी कार्तिकेयाने स्वत: श्री गणेशाची आराधना करून येथे या गणपतीची स्थापना केली, असे मानले जाते. देशभरातील 21 गणेश पीठांपैकी हे 17 वे पीठ असून ते लक्षविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराण, गणेशपुराण आणि स्कंद पुराणातही या नवसाला पावणार् या स्थानाची माहिती आहे. फारशी प्रसिद्धी नसल्याने या मंदिराविषयी लोकांना विशेष माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती देत आहोत. या गणेशाची आख्यायिका आणि मंदिराची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

Aug 29,2017 10:04:00 AM IST
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळात आराध्य दैवत श्री गणेशाचे पुरातन देवालय आहे. तारकासुर या दैत्याचा वध करताना स्वामी कार्तिकेयाने स्वत: श्री गणेशाची आराधना करून येथे या गणपतीची स्थापना केली, असे मानले जाते. देशभरातील 21 गणेश पीठांपैकी हे 17 वे पीठ असून ते लक्षविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराण, गणेशपुराण आणि स्कंद पुराणातही या नवसाला पावणार्‍या स्थानाची माहिती आहे. फारशी प्रसिद्धी नसल्याने या मंदिराविषयी लोकांना विशेष माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती देत आहोत.

या गणेशाची आख्यायिका आणि मंदिराची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
आख्यायिका या मंदिरासंदर्भात काही अख्यायिका आहेत. त्यानुसार येथे पूर्वी दंडकारण्य होते. एलगंगा नदी आजही आहे. स्वानंदप्रभूंचा मुलगा लक्षनामक यांना ज्योतिर्मय अवस्थेत श्री गणेशाचे दर्शन येथे झाले. त्याने 1 हजार वर्षे तपश्चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. तू माझ्या नावाने प्रसिद्ध हो असा वरही त्याने मागितला. त्यावरूनच या गणपतीला लक्षविनायक हे नाव पडल्याची एक आख्यायिका आहे. तर, दुसरी एक आख्यायिका आहे ती गणपतीचा भाऊ कार्तिकेयाची. राक्षसाचे पारिपत्य करण्यासाठी महादेवाची आज्ञा घेऊन कार्तिकस्वामी येथे आले. त्यांनी ‘ॐ गं गणपतये नम:’; चा रोज एक लाख जप तब्बल हजार वर्षे केला. तेव्हा गणपती प्रसन्न होऊन प्रकट झाले. गणरायाने कार्तिकेय स्वामींना एक आयुध दिले. त्याच्याच मदतीने कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. पुराणातही तसा उल्लेख आहे.घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून लक्षविनायकाचे मंदिर फक्त 2 किमी अंतरावर आहे. चारही बाजूंनी शेत आणि मधोमध हे देवालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नीरव शांतता असते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोर गणरायाचे वाहन उंदराची मूर्ती दिसते. आत सभामंडप व त्याही आत छोटा गाभारा आहे. त्यामध्ये लक्षविनायकाची साडेतीन फुटांची मूर्ती दिसते. मूर्तीचा एक हात मांडीवर, तर दुसर्या हातात मोदक दिसतो. वरच्या दोन हातांत आयुधे आहेत, पण ती स्पष्ट दिसत नाहीत.कार्तिक स्वामींनी केली मूर्ती यानंतर कार्तिक स्वामींनी येथे शाडू मातीची गणपतीची मूर्ती करून तिची येथे प्रतिष्ठापना केल्याचे मानले जाते. शेंदूर लावल्याने ती स्पष्ट दिसत नाही. साडेतीन फूट उंचीच्या या मूर्तीच्या डोक्यावर सुपारी आहे. ती कार्तिक स्वामींनी युद्धाला जाताना ठेवली होती. मूर्ती उत्तराभिमुख असून दिवसा मंदिरातील इतर भागात अंधार असतो, मात्र मूर्तीवर उजेड पडेल अशी या मंदिराची रचना आहे.अहिल्याबाईंनी केला जीर्णोद्धार लक्षविनायक हे वेरुळात घृणेश्वराच्या आधी स्थापन झाले आहेत. घृष्णेश्वरासोबतच अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. घृष्णेश्वराच्या मंदिराला जो लाल दगड आहे तसाच दगड येथेही वापरण्यात आला आहे. मंदिरात मागच्या बाजूला जुना आड आहे. त्यामागे असलेल्या शमीपत्राची पाने या गणपतीला वाहिली जातात.लक्षविनायक मंदीर
X