आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे होते वशीकरण, पुरुषाला वश करण्यासाठी महिला करतात अशी पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंतेवाडा : आजकाल अशा काही घटना कानावर पडतात ज्यावर लवकर विश्वास बसत नाही. उदा. एखाद्या बाहेरील स्त्रीसोबत पतीचे अफेअर असल्यामुळे कुटुंबात वाद आणि कलह निर्माण होतो आणि हे प्रकरण घटस्फोट किंवा मर्डरपर्यंत पोहोचते. अशा वेळी घरगुती महिला हा कलह नष्ट करण्यासाठी पतीला वश करण्यासाठी प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगत आहोत. येथे गेलेल्या पती-पत्नीमधील केवळ प्रेम वाढतच नाही तर यांचे नाते सात जन्मासाठी बांधले जाते. 

कुठे आहे हे मंदिर... 
- दंतेवाडापासून 25 किमी अंतरावर छिंदनार गावापासून 4 किमी दूर घनदाट जंगलात मुकडी देवी (वन राक्षसी) चे मंदिर आहे.
- येथे प्रेमी युगुल, दाम्पत्य आपले नाते आणखी दृढ करण्यासाठी येतात. यासोबतच अशा काही पत्नी येतात ज्यांच्या पतीचे बाहेरील स्त्रीसोबत संबंध असतील.
- अशा महिला पतीला समजू नये गुपचूप या मंदिरात येतात.
- येताना त्या स्वतःसोबत पतीचा फोटो, केस किंवा वापरलेले कपडे घेऊन येतात आणि मंदिराजवळील एका दगडाखाली पुरून टाकतात.
- मंदिराच्या पुजाऱ्याला मनातील इच्छा सांगून नवस बोलून देवीचे दुरूनच दर्शन घेऊन निघून जातात.
- कारण या मंदिरात महिलांना प्रवेश वर्ज्य आहे. देवीचे साक्षात दर्शन महिलांसाठी घातक मानले जाते.
 
गुपचूप येतात प्रेमी 
- मंदिराचे पुजारी सुखदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे काही लोक येतात ज्यांना एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर एकतर्फी प्रेम असते.
- असे लोक आवडत्या व्यक्तीचा फोटो किंवा केस घेऊन येतात आणि त्याचे नाव घेऊन दगडाखाली पुरून टाकतात.
- मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीसाठी हा विधी केला जातो तो, सर्व बंधन तोडून हा उपाय करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतो.

इच्छा पूर्ण झाल्यास प्रसाद अर्पण करण्यात येतात...
- इच्छा पूर्ण झाल्यास लोक या देवीला बोकड किंवा इतर प्राण्याची बळी देतात. 
- या देवीला जीव बळी देण्याची प्रथा आहे.

घनदाट जंगलात आहे मंदिर...
- हे मंदिर कोणी बांधले आणि यामागे काय मान्यता आहे याविषयी कोणलाही माहिती नाही.
- मंदिर घनदाट जंगलात असून येथे 3 फुटाची देवीची मूर्ती  आहे.
- सध्याच्या पुजाऱ्याचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून या देवीची सेवा करत आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या ठिकाणचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...