आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयाग क्षेत्रावरच का केले जाते पिंडदान आणि मुंडन, काय आहे विधान?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी पितृपक्षात पितरांना पिंडदान केले जाते. पिंडदानापूर्वी केश दान केले जाते. धार्मिक गंथानुसार पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि मुंडनाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीर्थराज प्रयाग येथे गंगा आणि संगम स्थानावर केशदान आणि पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. "प्रयाग मुंडे, काशी ढूंढे, गया पिंडे" याचे सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, प्रयाग येथे पिंडनदान आणि केशदान करण्याचे का विशेष महत्त्व आहे.

प्रयागमध्ये 12 रूपात विराजमान आहे भगवान विष्णू
- महानिर्वाणी आखाडा संत स्वामी नित्यानंद गिरी यांच्यानुसार धर्म शास्त्रामध्ये भगवान विष्णू याना मोक्ष अर्थात मुक्ती देवताना मानले जाते.
- प्रयागमध्ये भगवान विष्णू बारा विभिन्न रूपामध्ये विराजमान आहेत. मान्यतेनुसार त्रिवेणी संगमावर भगवान विष्णू बालमुकुंद स्वरूपात वास करतात.

पहिले प्रयाग, काशी मध्य आणि गया अंतिम द्वार
- प्रयागला पितृ मुक्तीचे पहिले द्वार मानले जाते. काशीला मध्ये आणि गया शेवटचे द्वार आहे.
- प्रयागमध्ये श्राद्ध कर्माची सुरुवात मुंडन संस्काराने होते. येथे मुंडन केल्यानंतर केस दान केले जातात.
- त्यानंतर तीळ, पीठ, भाताचे 17 पिंड तयार करून विधिव्रत त्यांची पूजा करून गंगेमध्ये विसर्जित केले जातात. त्यानंतर संगमावर स्नान करून तर्पण करण्याची प्रथा आहे.
- त्रिवेणी संगमावर पिंडदान केल्यास भगवान विष्णुसहित प्रयाग येथे वास करणारे 33 कोटी देवी-देवता पितरांना मोक्ष प्रदान करतात.

पुढे वाचा, प्रयाग येथे का केले जाते केशदान...
बातम्या आणखी आहेत...