विशेष : भारतातील / विशेष : भारतातील एकमेव मोदकाच्या आकाराचे श्रीगणेश, अशी आहे कथा

महाराष्ट्रात विविध गणेश मंदिरांचे विशेष महत्त्व आहे यामधीलच एक खास आहे दर्शनाने चित्त शुद्ध करणारे नाशिकचे मोदकेश्वर मंदिर. गाेदावरी तिरावर पुर्वाभिमुख असलेले स्वयंभू, जागृत अाणि अतिप्राचीन मंदिर अाहे. गाेदावरीच्या स्नानाने शरीर शुध्द हाेते तसेच माेदकेश्वरच्या दर्शनाने चित्त शुध्द हाेते असे मानले जाते. म्हणूनच मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे. पुढील स्लाईड्सवर वाचा, कशामुळे या मंदिराचे नाव मोदकेश्वर आहे...

जीवनमंत्र डेस्क

Aug 28,2017 11:06:00 AM IST
महाराष्ट्रात विविध गणेश मंदिरांचे विशेष महत्त्व आहे यामधीलच एक खास आहे दर्शनाने चित्त शुद्ध करणारे नाशिकचे मोदकेश्वर मंदिर. गाेदावरी तिरावर पुर्वाभिमुख असलेले स्वयंभू, जागृत अाणि अतिप्राचीन मंदिर अाहे. गाेदावरीच्या स्नानाने शरीर शुध्द हाेते तसेच माेदकेश्वरच्या दर्शनाने चित्त शुध्द हाेते असे मानले जाते. म्हणूनच मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, कशामुळे या मंदिराचे नाव मोदकेश्वर आहे...
प्राचीन काळी देवतांनी भक्तिभावाने आणि परिश्रमाने महाबुद्धी-अमृताने भरलेला मोदक महादेवांकडे दिला. आपल्या मुलांसाठी तो मोदक शिवशंकर कैलास पर्वतावर घेऊन आले परंतु तो खाण्यासाठी स्कंद (कार्तिकेय) आणि गणेश यांच्यात भांडण झाले. यावर उपाय म्हणून दोन्ही भावंडांना पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य ज्याच्याकडे असेल त्याला मोदक दिला जाईल असे सांग्यात आले. त्यावेळी आपल्या हुशारीने गणेशाने आपल्या आई-वडिलांची पूजा करून तीन प्रदक्षिणेचे पुण्य मिळवून मोदकावर आपला हक्क मागितला. हाच मोदकेश्वर आपल्या हातातला मोदक खात खात आकाश मार्गाने भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्याच्या हातातील मोदक खाली पडला. आपली अतिशय आवडीची वस्तू हातातून खाली पडल्यामुळे मोदकेश्वर खाली उतरला, याची आठवण रहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेशमूर्तीच्या स्वरुपात तेथे वास्तव्य केले.मंदिराचा मुळ गाभारा हा चार खांब असलेला व त्यात माेदकेश्वर विराजमान अाहे. प्रात:काळी काेवळी सुर्यकिरणे नेमकी माेदकेश्वरच्या चरणावर पडतात. मागील बाजूस रिध्दी सिध्दी देवी मूर्ती अाहेत.दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी भल्या पहाटे पासून गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.माेदकेश्वर गजाननाचे स्थान महात्म्याचे वर्णन गणेश पुराण, गणेश काेश, पंचवटी यात्रा दर्शन, गाेदावरी महात्म्य, नाशिक तिर्थक्षेत्र दर्शन यात अाढळते. प्रसिध्द २१ गणेश क्षेत्रात माेदकेश्वर गणपतीची गणना हाेते.

प्राचीन काळी देवतांनी भक्तिभावाने आणि परिश्रमाने महाबुद्धी-अमृताने भरलेला मोदक महादेवांकडे दिला. आपल्या मुलांसाठी तो मोदक शिवशंकर कैलास पर्वतावर घेऊन आले परंतु तो खाण्यासाठी स्कंद (कार्तिकेय) आणि गणेश यांच्यात भांडण झाले. यावर उपाय म्हणून दोन्ही भावंडांना पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य ज्याच्याकडे असेल त्याला मोदक दिला जाईल असे सांग्यात आले. त्यावेळी आपल्या हुशारीने गणेशाने आपल्या आई-वडिलांची पूजा करून तीन प्रदक्षिणेचे पुण्य मिळवून मोदकावर आपला हक्क मागितला. हाच मोदकेश्वर आपल्या हातातला मोदक खात खात आकाश मार्गाने भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्याच्या हातातील मोदक खाली पडला. आपली अतिशय आवडीची वस्तू हातातून खाली पडल्यामुळे मोदकेश्वर खाली उतरला, याची आठवण रहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेशमूर्तीच्या स्वरुपात तेथे वास्तव्य केले.

मंदिराचा मुळ गाभारा हा चार खांब असलेला व त्यात माेदकेश्वर विराजमान अाहे. प्रात:काळी काेवळी सुर्यकिरणे नेमकी माेदकेश्वरच्या चरणावर पडतात. मागील बाजूस रिध्दी सिध्दी देवी मूर्ती अाहेत.

दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी भल्या पहाटे पासून गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.

माेदकेश्वर गजाननाचे स्थान महात्म्याचे वर्णन गणेश पुराण, गणेश काेश, पंचवटी यात्रा दर्शन, गाेदावरी महात्म्य, नाशिक तिर्थक्षेत्र दर्शन यात अाढळते. प्रसिध्द २१ गणेश क्षेत्रात माेदकेश्वर गणपतीची गणना हाेते.
X
COMMENT