महाराष्ट्रात श्रीगणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत. परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या गावात नऊ गणेशाचे अधिष्ठान असल्यामुळे नवगण असे नामाभिधान या गावाला मिळाले. ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणांची स्थापना केली आहे. त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीता शोध सुरु केला होता. आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत. राजुरी गावाच्या परिसरात ऋषी-मुनींचे आश्रम होते. पश्चिमेला बाल्व ऋषींचा आश्रम होता म्हणूनच या डोंगरी भागाला बालाघाट असेही म्हटले जाते.
11 व्या स्लाईडवर घ्या, नवगण राजुरीच्या नऊ गणपतींचे दर्शन...
(फोटो : गणेश दहिवाले)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, ब्रह्मदेवाने येथे स्थापन केलेल्या गणेशांची माहिती आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण येथे कसे आले होते...