मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर तहसील क्षेत्रातील त्रिकुट पर्वतावर असलेल्या देवीच्या या मंदिराला मैहर देवीचे मंदिर म्हटले जाते. मैहरचा अर्थ आणि देवीचा हार. मैहर गावापासून 5 किलोमीटरवर त्रिकुट पर्वतावर शारदा देवीचा वास आहे. पर्वताच्या मध्यभागी देवीचे मंदिर आहे.
या मंदिराविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. हे मंदिर रोज रात्री बंद करण्यात येते. मान्यतेनुसार या मंदिरात रोज रात्री आल्हा आणि उदल नावाचे दोन चिरंजीवी दर्शनासाठी येतात आणि या दरम्यान एखादा मनुष्य याठिकाणी असल्यास त्याचा मृत्यू होतो.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराच्या इतर काही खास गोष्टी...