आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Patal Bhuvaneshwar 33 Crore Gods Devi Devta Temple In Uttarakhand Pithoragarh Gangoliha

Exclusive: हा आहे पाताळात जाण्याचा मार्ग, अशा धोकादायक वाटेवरून जावे लागते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिथौरागढ : हिमालयातील पर्वत रांगांमध्ये अशी एक गुहा आहे, ज्यामधून पाताळ लोकात जाण्याचा मार्ग आहे. या गुहेला पाताळ लोकांचे द्वारही म्हटले जाते. या गुहेचा उल्लेख महर्षी वेदव्यास यांनी स्कंद पुराणातील मानसखंडच्या 103 व्या अध्यायात केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने divyamarathi.comची टीम या पाताळ भुवनेश्वर गुहेचे दर्शन करण्यासाठी पोहोचली. ही गुहा उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोली-हाट येथे आहे. टीमला येथे पोहोचण्यासाठी तीन दिवस लागले. धोकादायक मार्ग आणि पर्वत पार करून गेल्यानंतर येथे पोहोचले.

6736 वर्षांपूर्वी लागला या गुहेचा शोध 
- गुहेचे पुजारी नीलम भंडारी यांच्यानुसार अयोध्येचे राजा ऋतुपर्णा भगवान शिवशंकराचे मोठे भक्त होते. त्यांनी या गुहेचा शोध लावला.
- पौराणिक इतिहासाशी संबंधित काही पुस्तकांचा अभ्यास केल्यास दिसून येते की, राजा ऋतुपर्णाचे साम्राज इ.स. पूर्व 4720 च्या जवळपास म्हणजे आतापासून 6736 वर्षांपूर्वी होते.

- समुद्र सपाटीपासून 1670 मीटर उंचीवर असलेल्या या गुहेपर्यंत पोहोचणे सोपे काम नव्हते.
- खूप अंतर चालून झाल्यानंतर आम्ही अल्मोडापासून 220 किमी सुंदर परंतु ढिकादायक पार्टवरील या गुहेत पोहोचलो.
- चारही बाजूला हिरवळ आणि उंच-उंच पर्वत होते. येथे सलग दोन दिवस प्रवास केला.
- मार्ग खूप अरुंद आणि निसरडा होता.
- येथील धोकादायक मार्ग आणि दरीचे फोटो आमच्या टीमने कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

(पाताळ भुवनेश्वर गुहेसाठी मृदुल राजपूत यांचा स्पेशल रिपोर्ट) 
पुढील स्लाईड्सवर पाहा, पाताळ भुवनेश्वर गुहेचा मार्ग...
बातम्या आणखी आहेत...