या मुस्लिम देशात / या मुस्लिम देशात बनत आहे विष्णूदेवाच्या गरुडाची मूर्ती, खर्च 650 कोटी

Oct 26,2017 03:33:00 PM IST
बाली : इंडोनेशियामध्ये जगातली सर्वात मोठा स्टॅच्यू (गरुड) बांधण्यात येत आहे. भगवान विष्णूंचे वाहन गरुडाच्या या मूर्तीची उंची 120 मीटर आणि लांबी 64 मीटर असेल. सध्या या मूर्तीचे फायनल शेपचे काम चालू आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा स्टॅच्यू बाली विमानतळाजवळच तयार होत आहे. यामध्ये 4 हजार टन तांबे, पितळ आणि स्टील वापरण्यात आले आहे. यासाठी 650 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.

वादळ-वाऱ्यातही स्थिर राहील...
- या प्रोजेक्टवर मागील 25 वर्षांपासून काम सुरु आहे. अनेक वर्षांपासूनची योजना, रि-डिझाईन, पैशांच्या कामामुळे याचे काम अनेक वर्षांपासून चालू-बंद होते.
- या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनिअर न्योमान यांच्यानुसार हा प्रोजेक्ट त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते.
- त्यांच्यानुसार ही मूर्ती इंजिनिअरिंगचा अद्भुत अविष्कार असेल. याची डिझाईन अशाप्रकारे केली आहे की, वादळ-वाऱ्यातही मूर्ती स्थिर राहील.
- अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा ही मूर्ती 30 मीटर उंच राहील.

पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...
X