आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे विदेशी महिला करत आहेत पिंडदान, पूर्वजांना मिळेल मोक्ष अशी भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया : मोक्ष स्थान गया येथे पितरांच्या मुक्तीसाठी चालू असलेल्या पितृपक्ष मेळ्यात शुक्रवारी देवघाटावरचे दृश्य काहीसे वेगळेच होते. प्रत्येकाची नजर एकाच ठिकाणी होती. ती म्हणजे विदेशी श्रद्धाळूंचा एक ग्रुप आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी तर्पण आणि पिंडदान करण्यात मग्न होता. या ठिकाणी अमेरिका, रशिया, जर्मनी आणि स्पेनच्या 20 पर्यटकांनी पिंडदान आणि तर्पण केले.

येथे येऊन मिळते शांती...
- जर्मनीच्या  इवगेनिया यांनी सांगितले की, भारत धर्म आणि अध्यात्माची भूमी आहे. येथे येऊन मला आंतरिक शांतीची अनुभूती होते. मी येथे माझ्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडदान करत आहे.

गया येथे पिंडदान केल्याने मिळतो मोक्ष
- मान्यतेनुसार जे लोक शरीर सोडतात ते कोणत्याही लोकात किंवा रूपात असले तरी श्राद्ध पक्षामध्ये पृथ्वीवर विष्णुपद क्षेत्रामध्ये अवश्य येतात आणि श्राद्ध-तर्पणाने तृप्त होतात.
- हिंदू मान्यतेनुसार पिंडदान मोक्ष प्राप्तीचा सोपा आणि सरळ मार्ग आहे. देशामध्ये विविध ठिकाणी पिंडदान केले जाते परंतु फल्गु नदीच्या तटावर असलेल्या गया येथे पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
- शास्त्रानुसार भगवान श्रीराम आणि देवी सीता यांनी राजा दशरथ यांच्या आत्मशांतीसाठी गया येथे पिंडदान केले होते.
- मान्यतेनुसार स्वतः भगवान विष्णू उइथे पितृ देवतेच्या रूपात स्थित असल्यामुळे हे 'पितृ तीर्थ' मानले जाते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, विदेशी महिलांनी केलेल्या पिंडदानाचे काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...