आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

215 कोटींमध्ये तयार झालेले हे 'मंदिर' आतून दिसते असे, मोदी-शिंजो येथे जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानचे पंतप्रधान शिंजो पत्नी अकी आबेसोबत बुधवारपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दुपारी मोदी यांनी शिंजो आबे यांना ऐतिहासिक ‘सिद्दी सैयद की जाली’ मशीद दाखवली आणि संध्याकाळी आगशीये रेस्तरॉमध्ये डिनरचे आयोजन केले. आज 14 सप्टेंबरला गांधीनगर येथील महात्मा मंदिरात दोन्ही नेत्यांमध्ये 12 वी भारत-जपान अॅन्युअल समिट होईल, यामध्ये दोन्ही देशाच्या फायद्यासाठी विविध करारांवर स्वाक्षरी केल्या जातील. या निमित्ताने आम्ही तुम्हाला गांधीनगरच्या महात्मा मंदिराविषयी खास माहिती देत आहोत.

मंदिराच्या खास गोष्टी...
- 8 जानेवारी 2011 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री सीएम नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे महात्मा मंदिराचे उद्घाटन केले होते/
- हे मंदिर बांधण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागले. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर 2011 ते 2013 काळात बांधून तयार झाले होते.
- या तीन माजली इमारतीमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
- उदा. बॅरिस्टर रूपात गांधी, दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
- महात्मा मंदिराचा पाया गुजरातच्या 18066 गावातील मातीने भरण्यात आला आहे.

215 कोटी रुपये खर्च
- 45 मीटर उंच गोलघुमट आकाराचे हे मंदिर बांधण्यासाठी 215 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- महात्मा मंदिराच्या पहिल्या टप्प्यात 135 कोटी खर्च आला. यामध्ये कन्वेंशन सेंटर, 3 मोठे प्रदर्शन हॉल आणि छोटे कॉन्फरन्स हॉल बनवण्यात आले.
- दुसऱ्या टप्प्यात 80 कोटी खर्चातून 'मिठाचा सत्याग्रह' आंदोलनाची आठवण स्वरूपात एक मेमोरियल हॉल आणि  एक गार्डन, सस्पेन्शन ब्रिज, पवन चक्की, उत्तम पार्किंग बनवण्यात आली.
 
15 हजार लोकांची क्षमता
- महात्मा मंदिराच्या 10000 स्क्वेअरफूट मध्ये पसरलेल्या पिलर नसलेल्या भव्य कन्वेंशन हॉलमध्ये एकाच वेळी 15000 लोक बसण्याची व्यवस्था आहे.
- मंदिरामध्ये 7 हायटेक कॉन्फ्रेंस हॉल आणि मॉडर्न मीटिंग रूम आहेत.
- विशेष गोष्ट म्हणजे येथे खंबा(पिलर)शिवाय मोठे हॉल बनवण्यात आले आहेत.
- महात्मा मंदिर कॅम्पसमध्ये एटीएम, ट्रॅव्हल डेस्क, फूड कोर्टसहित फोटो गॅलरी आहे.
- अहमदाबाद विमानतळापासून 20 किमी अंतरावर गांधीनगर येथे 34 एकर परिसरात हे मंदिर आहे. याच्या ठीक समोर दांडी कुटी आहे.

मंदिराचे काही निवडक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...