विशेष: स्वतः दत्तात्रयांनी / विशेष: स्वतः दत्तात्रयांनी स्थापन केलेला 'विज्ञान गणेशा', अशी आहे रोचक कथा

प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम येथे होता. प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम येथे होता.
विज्ञान गणेश मूर्ती विज्ञान गणेश मूर्ती
Aug 30,2017 01:04:00 PM IST
राक्षसभुवन हे नाव डोळयांसमोर आले की आपल्‍याला प्रथम शनिदेव आठवतात. याचे कारण म्हणजे या गावात भारतातील साडेतीन शनिपीठांपैकी एक असलेले हे प्रथम पीठ आहे. याची माहिती सर्वांनाच आहे परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की याच गावात संपूर्ण भारतातील 21 गणेशपीठांपैकी अत्‍यंत महत्वपूर्ण असलेले विज्ञान गणेश मंदिर आहे. याची स्‍थापना प्रभु दत्तात्रय यांनी केली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती आणि पौराणिक महत्त्व सांगत आहोत.

गणेशकोश, मुदगल पुराण, भविष्य उत्तर पुराण आणि विज्ञान गणेश मंदिराचे पुजारी संदीप लिंग्रस गुरुजी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राक्षसभवन या गावी प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम होता. पुजा, नामस्‍मरण, यज्ञ याग, गोसेवा, अतिथि सेवा, ब्राह्मण सेवा करणे त्‍यांचा नित्‍य दिनक्रम होता. त्‍यामुळे माता अनुसयाच्‍या पतीव्रतेची चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. पाहता पाहता ही बातमी देव ऋषि नारदमुनी यांनी ब्रम्‍हा, विष्णु, महेश यांच्‍या पत्नींना सांगितली. आपले पती या विश्वाचे चालक, सर्वश्री असताना आपणाहून अन्‍य कोणी महत्वपूर्ण किंवा पतीव्रता नसावे असा त्‍यांना गर्व होता. राक्षसभवन या गावात आपल्‍यापेक्षा श्रेष्‍ठ पतीव्रता अनुसयामाता राहते व तिची किर्ती सर्वत्र पसरत आहे, हे त्‍यांना सहन झाले नाही. हि बातमी त्‍यांनी आपल्‍या पतीला सांगीतली व असा हट्ट धरला कि तुम्‍ही 3 जणांनी राक्षसभुवनला जाऊन अनुसयेच्‍या पतीव्रतेचा भंग करावा.

कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
पत्नी हट्टापुढे या 3 देवाचे काही चालले नाही. साधुचे रुप घेऊन ते भुतलावर राक्षसभुवन या गावी अत्री व अनुसया यांच्या आश्रमात आले व आवाज दिला, ओम भवती भिषांम देहि. आवाज ऐेकल्यानंतर अनुसयामाता भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. मात्र या 3 देवांनी तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार दिला. तेव्हा माझी काही चुक झाली का?, असा प्रश्न अनुसयाने विचारला. तेव्हा 3 देवांनी तिला एक अट घातली की, तु कपडे न घालता भिक्षा वाढली तर भिक्षा घेऊ नसता निघुन जाऊ. ही विचित्र मागणी ऐकुन अनुसयेला धक्का बसला. ही विचित्र मागणी तिने पती अत्री ऋषींना सांगितली. अत्रींनी आपल्या दिव्य दृष्टिने पाहिले व पत्नीला परवानगी दिली तसेच कमंडलुतील तीर्थ देवांच्या अंगावर शिंपडण्यास सांगितले. पतीला नमस्कार करुन अनुसया 3 देवांकडे आली व पतीने दिलेले तीर्थ त्यांच्या अंगावर टाकले. तीर्थ टाकल्यानंतर आकस्मित प्रकार घडला ते तीघे देव बालक झाले. त्यामुळे आपल्या मुलांसमोर कपडे काढुन भिक्षा वाढण्यास अनुसयेस काहीही दोष लागला नाही व तिचे पतीव्रता व्रतही भंग झाले नाही.ही घटना नारदमुनीने ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या पत्नींना सागिंतली. आपले पती छोटे बालक झाले आहेत व ते माता अनुसयेकडे आहेत, हे समजल्यानंतर त्या तीघीजणी अनुसयेकडे आल्या. आमचा गर्व दुर झाला, असे त्यांनी अनुसयेला सांगितले व आमचे पती मुळ रुपात परत करावे अशी विंनती त्यांनी केली. पंरतु अनुसयेने आपले तीन बालक देण्यास नकार दिला. नारदमुनी, अत्री ऋषि, सर्व देवगण यांनी अनुसयेला विंनती केली की, हे देव विश्व चालक आहेत. ते मुळ रुपात येणे आवश्यक आहे. पंरतु अनुसया आपला हट्ट सोडत नव्हती. शेवटी पतीने समजुत काढुन तिला वरदान दिले की, या 3 देवांचे अंश रुप तुला मिळतील. अंश रुप मिळाल्यानंतर तीन देवाचें मुळ रुप देवांच्या पत्नींना अनुसयाने परत दिले. ते अंशरुप म्हणजेच दुर्वात्रय, चंद्रात्रय व दत्तात्रय होय. या पैकी दुर्वात्रय व चंद्रात्रय हे हिमालय मध्ये निघुन गेले. दत्तात्रय यांनी घोर तपस्या करुन विज्ञान गणेशाची स्थापना केली.येथे या ठिकाणी एकमुखी दत्तात्रयाची मूर्ती आहे.एकमुखी दत्तात्रयाची मूर्ती.विज्ञान गणेश मंदिरगोदावरी नदीच्या दक्षिण तटावर साधारण 1763-64 च्या आसपास हे मंदिर बांधलेले आहे.राक्षसभूवन गावात प्रवेश करताना ही कमान लागते.राक्षसभुवन शनी मंदिरशनिदेवाची मूर्ती आणि मूर्तीच्या उजव्या-डाव्या बाजूला राहू-केतूविज्ञान गणेश मंदिराचा मागील भागमंदिरातील गाभारा
X
प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम येथे होता.प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम येथे होता.
विज्ञान गणेश मूर्तीविज्ञान गणेश मूर्ती