भारतामध्ये आजही महिला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. आजही समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला जात नाही, तसेच भारतातील काही धार्मिक स्थळांमध्ये आजही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरांमध्ये केवळ पुरूषच प्रवेश करू शकतात. आज आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारतातील अशा काही धर्मिक स्थळांची माहिती सांगत आहोत. जेथे आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही.
पद्मनाभस्वामी मंदिर
भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. पद्मनाभस्वामी मंदिर विष्णू भक्तांचे प्रमुख आराधना केंद्र आहे. असे मानले जाते की, याठिकाणी सर्वात पहिले भगवान विष्णूची मूर्ती आढळून आली होती. त्यानंतर येथे मंदिराचे निर्माण करण्यात आले. या मंदिरामध्येही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.
पुढे वाचा, इतर कोणत्या सहा धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेश निषिद्ध आहे...