दिवसातून 3 वेळा / दिवसातून 3 वेळा रंग बदलते हे शिवलिंग, कोणालाही उलगडले नाही हे रहस्य

श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. भोलेनाथसुद्धा या महिन्यात आपल्या भक्तांना निराश न करता

जीवनमंत्र डेस्क

Aug 13,2017 09:00:00 AM IST
श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. भोलेनाथसुद्धा या महिन्यात आपल्या भक्तांना निराश न करता त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. राजस्थानमधील धौलपूरमध्ये चंबळ नदीजवळ स्थित अचलेश्वर महादेव मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होत आहे. यामागचे कारण म्हणजे येथील चमत्कारिक शिवलिंग. हे शिवलिंग दिवसातून तीन वेळेस रंग बदलते. आज आम्ही तुम्हाला या ऐतिहासिक मंदिराची खास माहिती सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, या मंदिराविषयी इतरही खास गोष्टी...
दररोज 3 वेळेस बदलतो शिवलिंगाचा रंग या शिवलिंगाचा रंग सकाळी लाल, दुपारी केशरी आणि रात्री सावळा दिसतो. असे का घडते हे गूढ आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला समजले नाही. मंदिरात विविध रिसर्च टीमने येउन शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या चमत्कारी शिवलिंगाचे रहस्य उघड झालेले नाही.कोणीही शोधू शकले नाही या शिवलिंगाचा अंत आजपर्यंत या शिवलिगनचा अंत कोणीही शोधू शकले नाही. अनेक लोकांनी शिवलिंगाच्या जवळ खोदकाम करून शेवटपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही यामध्ये यशस्वी झाले नाही. आजपर्यंत कोणालाही याचा शोध लागला नसून या शिवलिंगाचा रंग कशामुळे बदलतो या प्रश्नाचे रहस्यही कायम आहे.महादेवाच्या कृपेने मिळतो मनासारखा जोडीदार या चमत्कारी शिवलिंगाविषयी सांगितले जाते की, अविवाहित व्यक्तीने या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास त्याला मनासारखा जोडीदार मिळतो. या शिवलिंगाची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एक हजार वर्ष जुने आहे मंदिर स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे मंदिर एक हजार वर्ष जुने आहे. पूर्वी येथे पोहोचण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे फार कमी संख्येने भक्त येत होते, परंतु आता परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे भक्तांची संख्या वाढली आहे.

दररोज 3 वेळेस बदलतो शिवलिंगाचा रंग या शिवलिंगाचा रंग सकाळी लाल, दुपारी केशरी आणि रात्री सावळा दिसतो. असे का घडते हे गूढ आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला समजले नाही. मंदिरात विविध रिसर्च टीमने येउन शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या चमत्कारी शिवलिंगाचे रहस्य उघड झालेले नाही.

कोणीही शोधू शकले नाही या शिवलिंगाचा अंत आजपर्यंत या शिवलिगनचा अंत कोणीही शोधू शकले नाही. अनेक लोकांनी शिवलिंगाच्या जवळ खोदकाम करून शेवटपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही यामध्ये यशस्वी झाले नाही. आजपर्यंत कोणालाही याचा शोध लागला नसून या शिवलिंगाचा रंग कशामुळे बदलतो या प्रश्नाचे रहस्यही कायम आहे.

महादेवाच्या कृपेने मिळतो मनासारखा जोडीदार या चमत्कारी शिवलिंगाविषयी सांगितले जाते की, अविवाहित व्यक्तीने या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास त्याला मनासारखा जोडीदार मिळतो. या शिवलिंगाची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

एक हजार वर्ष जुने आहे मंदिर स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे मंदिर एक हजार वर्ष जुने आहे. पूर्वी येथे पोहोचण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे फार कमी संख्येने भक्त येत होते, परंतु आता परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे भक्तांची संख्या वाढली आहे.
X
COMMENT