येथे आहे एक / येथे आहे एक चमत्कारिक शिवलिंग, याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही

Nov 25,2017 12:08:00 PM IST

छत्तीसगढ राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील मरौदा गावातील जंगलात एक नैसर्गिक शिवलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. हे विश्वातील एकमेव नैसर्गिक शिवलिंग मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित एक अनोखे रहस्य याचे महत्त्व आणखीनच वाढवते. रहस्यमय गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची चमत्कारिक पद्धतीने वाढत आहे.


प्रत्येक वर्षाला शिवलिंग वाढते 6-8 इंच
या शिवलिंगाविषयी लोकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा आणि आस्था आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथे होणारा चमत्कार. हे शिवलिंग आपोआप मोठे होत आहे. हे जमिनीपासून 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. प्रत्येक वर्षी याची उंची मोजली जाते आणि यामध्ये 6 ते 8 इंच शिवलिंग वाढलेले आढळून येते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, या मंदिराविषयी इतर काही खास गोष्टी...

अशी झाली शिवलिंगाची स्थापना या शिवलिंग संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार, हजारो वर्षांपूर्वी येथे शोभा सिंह नावाचा एक व्यक्ती राहत होता. रोज संध्याकाळी तो आपले शेत पाहण्यासाठी जात होता. एके दिवशी त्याला शिवलिंगाच्या आकृतीसारख्या दगडामागून वाघ, सिंह प्राण्यांचे आवाज ऐकू आले. त्याने ही गोष्ट गावातील लोकांना सांगितली. प्राण्यांचा शोध घेण्यासाठी लोकांनी खूप शोधाशोध केली परंतु प्राणी आढळून आले नाहीत. तेव्हापासून या दगडाविषयी लोकांमध्ये आस्था निर्माण झाली आणि शिवलिंग रूपात पूजा सुरु केली. गावातील लोकांच्या मते, पूर्वी हे शिवलिंग खूप छोटे होते, परंतु काळासोबत याची उंची आजची वाढत आहे.विविध पुराणांमध्ये उल्लेख... हे ठिकाण भुतेश्वरनाथ, भकुरा महादेव नावाने ओळखले जाते. या शिवलिंगाचा उललकेह विविध पुराणांमध्ये आढळून येतो. पुराणांनुसार हे एक अनोखे आणि महान शिवलिंग आहे. याची पूजा-अर्चना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
X