आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

येथे आहे जगातील सर्वात मोठे मंदिर, भारतातून पाठवले होते 13,499 दगड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. तेथील उद्योगपतींची भेट घेतल्यानंतर शिवराजसिंह यांनी बुधवारी न्यूजर्सी स्थित स्वामी नारायण मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत पत्नी साधना सिंह आणि मुलगा कार्तिकेयसुद्धा उपस्थिती होता.न्युजर्सीच्या रॉबिन्सव्हिले येथे स्वामी नारायण संप्रदायाचे हे मंदिर भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण बोचासनवासी अक्षर पुरषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केले आहे. 

68 हजार क्युबिक फुट इटालियन करारा मार्बल
सुमारे 162 एकर परिसरात असलेल्या या मंदिरात प्राचिन भारतीय संस्कृती दिसून येते. या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 1.8 अमेरिकी डॉलर (सुमारे 108 कोटी रुपये) खर्च करण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 68 हजार क्युबिक फुट इटालियन करारा मार्बल आणि 13,499 दगडांचा वापर करण्यात आला आहे.आहे. त्यावर लक्षवेधक कोरीवकाम करण्यात आले आहे.
- अक्षरधाम मंदिर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये बांधण्यात आले आहे. एटलांटा, ह्यूस्टन, शिकागो, लॉस एंजिलिस सहित कॅनडाच्या टोरांटोमध्येही हे मंदिर आहे.
- याची मूळ संस्था बीएपीएस (बोकसंवासी श्रीअक्षर पुरूषोत्तम स्वामी नारायण संस्था) द्वारा निर्मित गांधी नगर गुजरात आणि दिल्लीच्या यमुना काठावरील मंदिर सर्वात मोठे आहेत.
- गांधीनगरचे मंदिर 23 एकरमध्ये तर दिल्लीचे 60 एकरमध्ये आहे. परंतु रॉबिन्सव्हिले येथील मंदिर या मंदिरांपेक्षा फक्त मोठे नसून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे.

1000 वर्षांपर्यंत असेच उभे राहील मंदिर 
- अमेरिकेचे पत्रकार स्टीव ट्रेडर यांनी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर न्यूजवर्क्‍स साइटवर लिहिले आहे की, 'मंदिरात प्रवेश केल्यानंतर अद्भुत शिल्पकलेवरून दृष्टी हटत नाही.
- या व्यतिरिक्त मंदिराच्या इंटिरिअरसोबतच बाहेरील भागही अशाप्रकारे बांधण्यात आला आहे की, 1000 वर्षांपर्यंत हे मंदिर असेच उभे राहील.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या मंदिराचे खास फोटो...