याच ठिकाणी बसून / याच ठिकाणी बसून लिहिण्यात आला 'पाचवा वेद' आजही आहे चमत्कारी कुंड

Nov 02,2017 03:27:00 PM IST
हिंदू धर्मातील प्रसिद्ध चार धाममधील एक बद्रीनाथ धाम भगवान विष्णू यांचे निवास स्थळ मानले जाते. हे भारताच्या उत्तराखंड राज्यात अलकनंदा नदीच्या काठावर नर-नारायण नामक दोन पर्वतांच्या मध्ये वसलेले आहे. बद्रीनाथ धामाशी विविध धार्मिक आणि पौराणिक कथांचा संबंध असून याच ठिकाणी बसून महार्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहिला. शास्त्रानुसार महाभारत पाचवा वेद आहे. येथे जाणून घ्या, बद्रीनाथ धामशी संबंधित 7 रोचक गोष्टी...

वेदव्यास यांनी या ठिकाणीच लिहिले होते महाभारत
मान्यतेनुसार, बद्रीनाथ धाम या ठिकाणीच वेदव्यास यांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजेच महाभारतची रचना केली होती. बद्रीनाथ येथे एक गुहा असून, यालाच महाभारताचे रचनास्थळ मानले जाते.

पुढील स्लाईडवर वाचा, बद्रीनाथ आणि भगवान विष्णू यांचा संबंध...
येथील कुंडातील पाणी नेहमी गरम राहते - अलकनंदा नदीच्या काठावर तप्त नावाचे एक कुंड आहे. या कुंडातील पाणी नेहमी गरम राहते, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुंड चमत्कारिक असण्यासोबतच खूप पवित्र मानले जाते. या कुंडात स्नान केल्यानंतर भक्तांना पापातून मुक्ती मिळते असे मानले जाते.भगवान विष्णू यांचे तपश्चर्या स्थळ पुराणानुसार, बद्रीनाथ धामची स्थापना सतयुगात झाली होती. या जागेला भगवान विष्णू यांची तपोभूमी मानले जाते. भगवान विष्णू यांनी अनेक वर्ष येथे तपश्चर्या केली आणि तेच या ठिकाणाचे पालनहार आहेत.कसे पडले या ठिकाणाचे नाव बद्रीनाथ असे मानले जाते की, भगवान विष्णू यांनी येथे कठोर तप केली. देवी लक्ष्मी यांनी बदरी म्हणजे बोराचे झाड बनून अनेक वर्ष भगवान विष्णू यांना सावली दिली आणि त्यांचे बर्फवृष्टी, वादळापासून रक्षण केले. देवी लक्ष्मीच्या या समर्पणावर खुश होऊन भगवान विष्णू यांनी ठिकाणाला बद्रीनाथ नावाने प्रसिद्ध होण्याचा आशीर्वाद दिला.शंकराचार्य यांना सापडली होती येथील मूर्ती मान्यतेनुसार, येथे स्थापित भगवान विष्णू यांची मूर्ती सर्वात पहिले आठव्या शतकात आदी शंकराचार्य यांना येथे एका कुंडात मिळाली होती. ही मूर्ती त्यांनी एका गुहेत स्थापित केली. त्यानंतर राजांनी वर्तमान मंदिराचे निर्माण करून मूर्ती या मंदिरात स्थापित केलीअसे आहे येथील भगवान विष्णूच्या मूर्तीचे रूप बद्रीनाथ धामच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू यांची चतुर्भुज मूर्ती स्थापित आहे, जी शाळीग्राम शिळेने बनलेली आहे. येथील मूर्ती खूप छोटी असून, या मूर्तीला हिरेजडीत मुकुट घातला जातो. येथे भगवान विष्णूसोबतच भगवान कुबेर यांची मूर्ती स्थापित आहे.येथे वाहते गंगेच्या 12 स्वरूपातील एक अलकनंदा असे मानले जाते की, ज्यावेळी गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले, तेव्हा गंगेचा वेग सहन करण्यात पृथ्वी असमर्थ होती. त्यामुळे गंगाने स्वतःला बारा भागांमध्ये विभाजित करून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाहित केले. अलकनंदा नदी त्याच 12 भागांमधील एक असून, या नदीच्या काठावर बद्रीनाथ धाम वसलेले आहे.
X