आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ आणि सलमान येथे बोलतात नवस, बिग बीसुद्धा आले आहेत अनवाणी पायाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण भारतात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या छतावर सोन्याचे छत्र लावण्यात आले आहे. येथे अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय, प्रियांकापासून ते कंगनापर्यंत बॉलिवूडचे कलाकार नवस बोलण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या व्हीव्हीआयपी भक्तांमुळे या गणेशाला सेलिब्रेटीज गणपती असेही म्हटले जाते. महानायक अमिताभ बच्चनही आपल्या फैमीसोबत येथे अनवाणी पायाने येऊन गेले आहेत.

जया बच्चनही रोज येत होत्या अनवाणी पायाने
- एक नवस पूर्ण झाल्यानंतर वर्ष 2008 मध्ये अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या आपल्या जुहू येथील बंगल्यापासून 15 किलोमीटर अनवाणी पायाने सिद्धिविनायक मंदिरात आले होते.
- 'कुली' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ जखमी झाले होते, तेव्हा जया बच्चन रोज ब्रीच कँडी हॉस्पिटलपासून सिद्धिविनायक मंदिरात चालत जात होत्या.

200 वर्ष जुने आहे मंदिर..
- हिंदू पंचांगानुसार ही तिथी दुर्मुख संवत्सरमध्ये कार्तिक शुद्ध चतुर्दशी, शके 1723 मध्ये येते.
- हे मंदिर प्रभादेवी येथे काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थित आहे.
- या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की, येथे बोलण्यात आलेला नवस पूर्ण होतो.

अशी आहे सिद्धिविनायक मूर्ती
- मान्यतेनुसार श्री सिद्धिविनायक मूर्ती काळ्या पाषाणात कोरून बनवण्यात आली आहे.
- मूर्तीची उंची 750 मिमी आणि रुंदी 600 मिमी आहे.
- ही उजव्या सोंडेची गणेश मूर्ती असून अत्यंत दुर्लभ मुद्रा आहे.
- उजव्या सोंडेच्या गणपतीला महागणपती म्हटले जाते.
- श्रीगणेशाच्या उजव्या हातामध्ये कमळ आणि डाव्या हातामध्ये परशु आहे. खालील उजव्या हातामध्ये जपमाळ आणि डाव्या हातामध्ये मोदक आहे.
- मूर्तीच्या कपाळावर एक नेत्र असून ते महादेवाच्या त्रिनेत्राप्रमाणे दिसते.
- श्रीगणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. 
- श्रीगणेश मूर्तीसोबत या दोन देवींच्या मूर्ती असल्यामुळे या मंदिराचे नाव सिद्धिविनायक गणपती असे आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सचे काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...