भारतातील 10 खास / भारतातील 10 खास गुरुद्वारे, प्रत्येकाचे खास महत्त्व आणि विशेष मान्यता

Nov 04,2017 12:08:00 PM IST
आज ( 4 नोव्हेंबर, शनिवार) कार्तिक पौर्णिमा आहे. हा दिवस शीख समुदायासाठी अत्यतं खास आहे. कारण याच दिवशी शिखांचे प्रथम गुरु नानकदेवजी यांची जयंती प्रकाश पर्व स्वरूपात साजरी केली जाते. या निमित्ताने आम्ही तुम्हाला 10 गुरुद्वारांची खास माहिती देत आहोत.

1.गुरुद्वारा हरमिंदर साहिब सिंह (पंजाब)
अमृतसरमधील हा गुरुद्वारा हरमिंदर साहिब सिंहला श्री दरबार साहिब आणि स्वर्ण मंदिर नावानेही ओळखले जाते. हा गुरुद्वारा अतिशय सुंदर असल्यामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मान्यतेनुसार या गुरुद्वाराच्या रक्षण करण्यासाठी महाराजा रणजित सिंह यांनी गुरुद्वाराचा वरील भाग सोन्याने झाकून टाकला होता. यामुळे याला स्वर्ण मंदिर नाव देण्यात आले.

इतर गुरुद्वारांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
2.गुरुद्वारा श्री हेमकुंड साहिब (उत्तराखंड) हा गुरुद्वारा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आहे. समुद्र उंचीपासून 4000 मीटर उंच आहे. हिमवृष्टीमुळे ऑक्टोबर ते एप्रिल या काळात हा गुरुद्वारा बंद असतो. हा गुरुद्वारा वास्तू कलेचे उत्तम उदाहरण आहे.3. हजूर साहिब गुरुद्वारा (महाराष्ट्र) हजूर साहिब शीख समुदायाच्या 5 तख्तांमधील एक आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात हा गुरुद्वारा आहे. यामधील गुरुद्वारा सचखंड नावाचे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी 1708 मध्ये गुरु गोविंदसिंह यांचा अंत्यविधी करण्यात आला होता. महाराजा रणजित सिंह यांच्या आदेशानंतर इ.स. 1832-1837 या काळात हा गुरुद्वारा बांधण्यात आला.4. गुरुद्वारा पांवटा साहिब (हिमाचल प्रदेश) - पांवटा साहिब गुरुद्वारा दहावे गुरु श्री गोविंदसिंह यांना समर्पित आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात हा गुरुद्वारा आहे. याच ठिकाणी गुरु गोविंदसिंह यांनी दशम ग्रंथची रचना केली होती.5. सीस गंज गुरुद्वारा (दिल्ली) हा दिल्लीतील सर्वात जुना आणि ऐतिहासिक गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वारा तेग बहादूर आणि त्यांच्या अनुयायांना समर्पित आहे. या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांना मृत्युदंड देण्यात आला होता. यांनी मुगल बादशाह औरंगजेबचा इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता.6. फतेहगढ साहिब (पंजाब) फतेहगढ साहिब पंजाबमधील फतेहगढ जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार 1704 मध्ये साहिबजादा फतेह सिंह आणि साहिबजादा जोरावर सिंह यांना फौजदार वजीर खानच्या आदेशावरून येथे भिंतीमध्ये जिवंत पुरण्यात आले होते. हा गुरुद्वारा यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आला आहे.7. तख्त श्री दमदमा साहिब (पंजाब) दमदमाचा अर्थ श्वास किंवा अराम स्थान असा होतो. गुरुद्वारा श्री दमदमा साहिब शीख समुदायाच्या 5 तख्तांमधील एक आहे. हा पंजाबमधील भटिंडा शहरापासून 28 किमी दूर तळवंडी गावामध्ये स्थित आहे. मुघल अत्याचाराविरुद्ध लढाई केल्यानंतर गुरु गोविंदसिंह येथे येऊन थांबले होते. यामुळे हे स्थान गुरु की काशी नावाने ओळखले जाते.8. गुरुद्वारा मणिकरण साहिब (हिमाचल प्रदेश) गुरुद्वारा मणिकरण साहिब मनालीच्या पर्वत रांगामध्ये असल्यामुळे येथील दृश्य अत्यंत मनमोहक आहे. मान्यतेनुसार हे असे पहिले ठिकाण आहे जेथे गुरु नानकदेव यांनी आपल्या प्रवासादरम्यान ध्यान लावले होते.9. गुरुद्वारा श्री केश्घर साहिब (पंजाब)10.गुरुद्वारा बंगला साहिब(दिल्ली)
X