मान्यता : येथे / मान्यता : येथे गणपतीला पत्र पाठवल्याने दूर होतात सर्व अडचणी

हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. परंतु भारतामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे प्रत्येक शुभकार्यापूर्वी देवाला पत्र पाठवून आमंत्रित केले जाते. या गणेश मंदिरात दररोज देवाच्या चरणांजवळ पत्र आणि निमंत्रण पत्रिकांचा ढीग जमा होतो. राजस्थानमधील सवाई माधवपूरपासून जवळपास 10 किलोमीटर असलेल्या रणथंबोर किल्ल्यातील हे गणेश मंदिर या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक घरातील कोणत्या शुभकार्यापूर्वी रणथंबोर येथील गणेशाच्या नावाने पत्र लिहायला विसरत नाहीत. पोस्टाने देवाला पाठवले जाते पत्र देशातील अनेक घरांमधून येथे श्रीगणेशाच्या नावाने पत्र येतात. कार्डवर पत्ता असा लिहिलेला असतो - श्रीगणेश, रणथंबोरचा किल्ला, जिल्हा - सवाई माधवपूर (राजस्थान). पोस्टमनसुद्धा पूर्ण आदराने हे कार्ड मंदिरात पोहचवतात. त्यानंतर पुजारी आलेले कार्ड गणेशाच्या चरणाजवळ ठेवतात. स्थानिक मान्यतेनुसार या मंदिरातील श्रीगणेशाला निमंत्रण पत्र पाठवल्यास सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Aug 29,2017 11:15:00 AM IST
हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. परंतु भारतामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे प्रत्येक शुभकार्यापूर्वी देवाला पत्र पाठवून आमंत्रित केले जाते. या गणेश मंदिरात दररोज देवाच्या चरणांजवळ पत्र आणि निमंत्रण पत्रिकांचा ढीग जमा होतो. राजस्थानमधील सवाई माधवपूरपासून जवळपास 10 किलोमीटर असलेल्या रणथंबोर किल्ल्यातील हे गणेश मंदिर या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक घरातील कोणत्या शुभकार्यापूर्वी रणथंबोर येथील गणेशाच्या नावाने पत्र लिहायला विसरत नाहीत.

पोस्टाने देवाला पाठवले जाते पत्र
देशातील अनेक घरांमधून येथे श्रीगणेशाच्या नावाने पत्र येतात. कार्डवर पत्ता असा लिहिलेला असतो - श्रीगणेश, रणथंबोरचा किल्ला, जिल्हा - सवाई माधवपूर (राजस्थान). पोस्टमनसुद्धा पूर्ण आदराने हे कार्ड मंदिरात पोहचवतात. त्यानंतर पुजारी आलेले कार्ड गणेशाच्या चरणाजवळ ठेवतात. स्थानिक मान्यतेनुसार या मंदिरातील श्रीगणेशाला निमंत्रण पत्र पाठवल्यास सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.

या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
अशी झाली मंदिराची स्थापना हे मंदिर 10 व्या शतकात रणथंबोरचे राजा हमीर यांनी बांधले होते. युद्ध काळात राजाच्या स्वप्नामध्ये श्रीगणेश आले त्यांनी राजाला आशीर्वाद दिले. राजाचा त्या युद्धामध्ये विजय झाला आणि त्यांनी किल्ल्यात मंदिराचे निर्माण केले.अशी आहे श्रीगणेशाची मूर्ती येथील श्रीगणेशाच्या मूर्तीला तीन डोळे आहेत. येथे श्रीगणेश पत्नी रिद्धी-सिद्धी आणि पुत्र शुभ-लाभ यांच्यासोबत विराजित आहेत. भगवान गणेशाचे वाहन मूषक(उंदीर)ही मंदिरात आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी किल्ल्यातील मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.रणथंबोर किल्ला
X