आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होतात हे 10 फायदे, वजन राहते नियंत्रणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात सर्वात जास्त चवीने खाल्ल्या जाणार्‍या फळांमध्ये टरबूजाचे नाव सर्वात पुढे आहे. हे चविष्ट, पौष्टिक आणि तहान भागवणारे फळ आहे. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जासुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. टरबूजामध्ये 90 टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स 'ए' आणि 'सी' देखील असतात. येथे जाणून घ्या, उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने इतर कोणकोणते फायदे होतात.

वजन कमी करते -
यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. या दोन्ही गोष्टी वजन वाढवण्यासाठी पूरक असतात. टरबूजामध्ये आढळून येणारे सिट्रयूलाइन नावाचे तत्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्व वसा तयार करणार्‍या पेशींना कमी करते. टरबूजामध्ये असेलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंग दरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. वर्ष 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जर्नल ऑफ नयूट्रीशननुसार टरबूजामध्ये उपलब्ध असलेले एमिनो एसिड आर्जिनीन शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत प्रणाली योग्य ठेवते.

पुढे जाणून घ्या, टरबूज खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे आणि खास उपाय..