आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Benefits : कोरडा कफ आणि सायनसमध्ये आराम देतो कडीपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहजपणे मिळणार्‍या कडीपत्त्याचा वापर विशेषतः भाजीमध्ये व डाळीला तडका मारण्यासाठी केला जातो. दक्षिण भारतीय पदार्थ सांबर, रसम यामध्ये या पानांचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. या पानांमध्ये स्वयंपाकाची चव वाढवण्यासोबतच विविध औषधी गुण आहेत. एका संशोधनानुसार 100 ग्रॅम कडीपत्त्यामध्ये 66 टक्के मॉइश्चर, 6.1 टक्का प्रोटीन. 1 टक्का वसा. 16 टक्के कार्बोहायड्रेट, 6.4 टक्के मिनिरल वॉटर आढळून येते. कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कडीपत्त्याचे काही खास उपाय सांगत आहोत...

कोरडा कफ -
कोरडा कफ आणि सायनसमुळे होणार्‍या कफची समस्या खूप गंभीर आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' सोबतच अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल एजंट असतात जे कफ बाहेर काढण्यास मदत करतात. कफ कमी करण्यासाठी एक चमचा कडीपत्ता चूर्ण आणि एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्या.

अपचनाची समस्या दूर होते -
मसालेदार, तेलकर आहार आणि इतर कारणांमुळे होणारी अपचनाची समस्या दूर करण्यासाठी कडीपत्ता उपयुक्त ठरतो. तुप गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे, कडीपत्ता, दीड चमचा सुंठ आणि थोडेसे पाणी टाकून उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर प्यायल्यास अपचनाची समस्या त्वरित दूर होते.

कडीपत्त्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...