आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tulsi Can Help You In Flu, To Remove Kidney Ston

तुळशीचा काढा प्यायल्याने बाहेर पडतो मुतखडा, वाचा इतर 10 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये तुळस आढळून येते. हिंदू संस्कृतीमध्ये तुळस पूजनीय रोप मानले जाते. तुळशीचे रोप अंगणात लावल्याने रोग घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि यामुळे हवा शुद्ध होते. तुळशीचे वानस्पतिक नाव ऑसिमम सँक्टम असे आहे. आदिवासी भागातही तुळशीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग करतात. आज आम्ही तुम्हाला तुळशीशी संबंधित आदिवासी लोकांचे रामबाण उपाय सांगत आहोत.

1. मुतखडा दूर करण्यासाठी -
तुळशीचे पाने उकळून काढा तयार करून घ्या. या काढ्यामध्ये मध टाकून नियमित सहा महिने याचे सेवन केल्यास मुतखडा लघवीद्वारे बाहेर पडेल. हा सोपा आणि अचूक उपाय आहे.

शास्त्रामध्येही सांगण्यात आले आहे की...
त्रिकाल बिनता पुत्र प्रयाश तुलसी यदि।
विशिष्यते कायशुद्धिश्चान्द्रायण शतं बिना।।
तुलसी गंधमादाय यत्र गच्छन्ति: मारुत:।
दिशो दशश्च पूतास्तुर्भूत ग्रामश्चतुर्विध:।।

जर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर मनुष्याचे शरीर एवढे शुद्ध होते, जेवढे चांद्रायण व्रत केल्यानंतरही होत नाही. तुळशीचा गंध जेवढा दूरपर्यंत जातो तेथील वातावरण आणि त्याठिकाणी निवास करणारे जीव निरोगी आणि पवित्र राहतात.

तुळशी संदर्भात विशेष आणि महत्त्वाची माहिती डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी सांगितली आहे. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

पुढे जाणून घ्या, तुळशीचे इतर काही खास फायदे आणि रामबाण उपाय....