आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : उत्तम डायजेशनसाठी अवलंब करा या 15 सोप्या टिप्सचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य शरीरातली पाचनतंत्र हे त्याच्या शरीरातील अनेक अवयवांनी बनलेले आहे. या तंत्रामुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात. यामुळे पाचनतंर नेहमी हेल्दी असणे आवश्यक आहे. सकाळी पोट चांगल्याप्रकरे साफ होणे, हे निरोगी असण्याचे उत्तम लक्षण आहे. परंतु आहारात अनियमितपणा, धावपळीचे जीवन आणि तणाव व्यक्तीच्या पाचनतंत्रावर वाईट प्रभाव टाकतो.

बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस यामुळे वृद्धच नाही तर तरुण पिढीसुद्धा त्रस्त आहे. झोप पूर्ण न होणे, तणाव, व्यसन, स्मोकिंग या गोष्टीसुद्धा पोटाच्या विकारांसाठी कारणीभूत ठरतात. आपल्या जीवनातील या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहण्यासाठी आणि पाचनतंत्र स्वस्थ ठेवण्यासाठी येथे सांगण्यात आलेले सोपे उपाय अवश्य करून पाहा...


1. कोमट पाणी प्यावे

खाल्लेले अन्न पचण्यास त्रास होत असेल तर कोमट पाणी प्यावे. सकाळी कोमट पाणी प्यावे आणि जेवणाच्या कमीतकमी अर्धा तास अगोदर पाणी प्यायल्याने पाचनतंत्र ठीक राहते.


2. वजन नियंत्रित ठेवा -

लठ्ठपणा किंवा जास्त वजन असल्यास हार्टबर्न आणि गॅससारख्या पाचन समस्या निर्माण होतात. उत्तम पाचनतंत्रासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. लठ्ठपणा किंवा जास्त वजन तुमचे पाचनतंत्र बिघडवू शकतो.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...