आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवस अगोदरच मिळतात हार्ट फेल्युअरचे 6 संकेत, करु नका इग्नोर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट फेल्युअर झाल्यावर असे मानले जाते की, यामध्ये हार्ट काम करणे बंद करते. परंतु ते पुर्ण सत्य नाही. हार्ट फेल्युअर झाल्यावर हार्टची ब्लड पंप करण्याची क्षमता कमजोर होते. म्हणजे यामध्ये रुग्णाचा लगेच मृत्यू होत नाही. त्याच्या जीवाला असलेला धोका वाढतो. अशा वेळी सांभाळून राहणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला हार्ट फेल्युअर संकेत माहिती असावे. सुरुवातीलाच मिळतात संकेत...

बॉम्बे हॉस्पिटरचे कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. इदरीस खान सांगतात की, जास्तीत जास्त हार्ट फेल्युअरच्या केसेसमध्ये हार्ट फेल्युअर संकेत 15 दिवस अगोदरच दिसतात. जर वेळेअगदोर हे ओळखून इलाज सुरु केला तर अनेक धोके टाळता येऊ शकतात आणि प्राण वाचवता येऊ शकतात.

हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक आहे?

हार्ट अटॅक :
जेव्हा आर्टरीज ब्लॉक झाल्यामुळे ब्लड हार्टपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक किती मोठा किंवा गंभीर होता हे आर्टरीजमधील ब्लॉकेजवर अवलंबून असते. जर ब्लॉकेज जास्त असतील किंवा वेळेअगोदर ब्लॉकेज दूर केले नाही तर हार्ट काम करणे बंद करते. यामध्ये रुग्णाचा काही वेळातच मृत्यू होऊ शकतो.
 
कार्डियक अरेस्ट :
जेव्हा ह्रदयाचे ठोके बंद होतात तेव्हा तो कार्डियक अरेस्ट असते. काही इलेक्ट्रिकल तरंग या ह्रदयाच्या ठोक्यांसाठी जबाबदार असतात. जेव्हा या इलेक्ट्रिकल तरंग बंद होतात तेव्हा ह्रदयाचे ठोके पडणे बंद होते. यामधील जास्तीत जास्त प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होतो. तर काही प्रकरणात ह्रदयाला शॉक दिल्यानंतर ठोके पुन्हा सुरु होतात.
 
हार्ट फेल्युअर :
याचा अर्थ म्हणजे, ह्रदयाची पंप करण्याची क्षमता कमजोर होते. म्हणजे यामध्ये रुग्णाचा अचानक मृत्यू होत नाही. परंतु वेळेत उपचार करणे आवश्यक असते. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट फेल्युअर होण्याच्या अशाच संकेतांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...