आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cauliflower Offers Impressive Benefits On Numerous Aspects Of Your Health

फुलकोबीचे 7 BENEFITS, जे क्वचितच तुम्हाला माहिती असावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलकोबी संपूर्ण भारतात भाजी स्वरुपात प्रचलित असून याचे पिक जवळपास सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. फुलकोबीचे वनस्पतिक नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया बॉट्रिटीस असे आहे. फुलकोबीपासून विविध चविष्ट भाज्या केल्या जातात परंतु फार कमी लोकांना य्मधील औषधी गुणांची माहिती असावी. आज आम्ही तुम्हाला फुलकोबीमधील औषधी गुणांची विशेष माहिती सांगत आहोत.

फुलकोबीशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फोस्फरस, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह तत्त्व तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन, आणि पोटॅशियम हे उपयोगी तत्त्व आढळून येतात. हे सर्व तत्त्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण रसायनांची खान आहेत.

1 - आदिवासी लोकांच्या माहितीनुसार फुलकोबीच्या पानांना कुटून रस तयार करून घ्या. या रसाने गुळणा केल्यास हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते. कच्ची फुलकोबी चावून चावून खाल्ल्यास हिरड्यांवरील सूज कमी होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, फुलकोबीचे इतर काही खास फायदे आणि उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात येत आहे)