आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभीच्या इन्फेक्शनची समस्या दूर करतील हे 7 घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाभी शरीरावरील सर्वात कोमल भाग आहे. नाभीची निगा राखणे चेहरा आणि शरीराच्या इतर अवयवांएवढीच आवश्यक आहे. गर्भामध्ये बाळाचा विकास पूर्णपणे नाभिद्वारेच होतो. बॉडीचा सेंटर पॉइंट असूनही अनेक लोक नाभीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे विविध प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो. नाभीमध्ये इन्फेक्शनचा धोका कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. नवजात शिशूलासुद्धा हा धोका राहतो. हा दोन प्रकारचा असतो - बॅक्टेरिअल आणि यीस्ट इन्फेक्शन.

नभीचा भाग खूप खोल असतो. त्यामुळे येथे या दोन्ही इन्फेक्शनचा धोका राहतो. घाम, साबण, पियर्सिंगसुद्धा बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढवू शकतात. या व्यक्तिरिक्त स्वच्छ न राहण्याची सवय, सर्जरी, डायबिटीज यासारखे आणि इतरही कारण असू शकतात. या इन्फेक्शनमुळे नाभी लाल होणे, वेदना, सूज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगत आहोत.

नाभीचे इन्फेक्शन दूर करणारे खास उपाय
मीठ टाकलेले गरम पाणी
नाभीचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मीठ टाकलेले गरम पाणी. या पाण्याचा वापर करून इन्फेक्शन झालेल्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन जलद गतीने होईल. मीठ नाभीतील आद्रता शोषून घेते, यामुळे इन्फेक्शनची समस्या दूर होते.

असा करावा उपाय
-1 चमचा मीठ एक कप गरम पाण्यामध्ये टाका.
-कापूस किंवा सुती कपड्याने हे पाणी नाभीवर चांगल्याप्रकारे लावा.
-थोड्यावेळाने नाभीवर अँटीबॅक्टेरिअल क्रीम लावा.
-दिवसातून तिन-चार वेळेस हा उपाय केल्यास लाभ होईल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय....
बातम्या आणखी आहेत...