आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी करा हे सोपे 8 उपाय; शरीर होईल ठणठणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य कसे उत्तम ठेवावे हा प्रश्न महिलांच्या डोक्यात सतत येत असतो. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्म दोन्ही विचार येत असतात आणि त्यावर आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते. त्यामुळे नेहमी सकारात्म गोष्टी मनात आणल्याने तुमचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होईल.तुमचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी येथे 8 उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य 60 सेकंदात हेल्दी करू शकता.
डोळ्यांना आराम द्या...
ऑफिस आणि कॉलेजमध्ये जाणा-या व्यक्ती त्यांचा अधिक वेळ हा कॉम्पुटर वापरण्यात घालवत असतात. त्यांच्या या वापरामुळे स्क्रिनच्या लाइटमुळे आणि खादे वाकवून काम करण्याच्या पद्धतीमुळे डोळ्यांवर तसेच डोक्यावर ताण पडतो. त्यामुळे तुम्ही देखील दिवसातील बराच वेळ कॉम्पुटरवर काम करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने डोळ्यांना आराम द्या. डोळ्यांचे डॉक्टर या व्यक्तींसाठी 20-20-20 असा व्यायाम करण्यास सांगतात. यामध्ये दर 20 मिनिटांनंतर 20 सेकंदांसाठी 20 फुटापर्यंतच्या एखाद्या वस्तुकडे बघावे. याशिवाय तुम्ही अधून-मधून तुमच्या खुर्चीवरून उठून दोन्ही हात वर उचलावे आणि स्ट्रेच करावे यामुळे शरिरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते आणि डोळ्यांना आरामही मिळतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, पुढील 8 सोप्या ट्रिक्सबद्दल...