आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाळ्यात या फळाचा लाभ घ्या, दूर होतील या समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात फळांना भरपूर मागणी असते. काही लोक टेस्ट करण्यासाठी फळांचा स्वाद घेतात तर काही लोक आरोग्यदायी फायद्यासाठी. या फळांमध्ये जर्दाळू हे एक विशेष फळ आहे. यामध्ये भरपूर औषधी गुण आहेत. तब्येत आणि त्वचेसाठी हे फळ अत्यंत लाभदायक मानले जाते. येथे जाणून घ्या, जर्दाळू खाल्ल्याने कोणते शारीरिक लाभ होतात.

लिव्हरचे आजार राहतात दूर -
जर्दाळू खाल्ल्याने लिव्हर सुरक्षित राहते. अनियमित आणि खराब आहाराचा सर्वात जास्त आणि लवकर प्रभाव लिव्हरवर पडतो. यामुळे हिपेटिक स्टीटोसिस ( hepatic steatosis ) आजार होण्याची शक्यता सर्वात जास्त राहते. परंतु जर्दाळू लिव्हरची अंतर्गत स्वच्छता करून आजारांना दूर ठेवते.

डोळ्यांची शक्ती वाढते -
डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले व्हिटॅमिन ए जर्दाळूमध्ये भरपूर प्रमाणात असते. फक्त एक जर्दाळू खाऊन 60 टक्क्यापर्यंतच्या व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढली जाऊ शकते. तसेच वाढत्या वयामुळे डोळ्यांच्या निर्माण होण्याऱ्या समस्या जर्दाळूमुळे नष्ट होतात.

जर्दाळूचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...