आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावमुक्त जीवन जगल्यास पित्ताची समस्या दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल आल्याने आरोग्याचे सर्वात मोठे नुकसान होत आहे. यामुळे हल्लीच्या काळात पित्त होणे ही तक्रार नेहमीच ऐकायला मिळते. यावर उपाय म्हणजे पित्त होते कशामुळे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीचा आहार, तणाव तसेच व्यायाम न करणे ही यापैकी काही कारणे असू शकतात. थायरॉइड किंवा त्रासदायक बॉवल सिंड्रोममुळेही पित्ताचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही अन्य औषधे घेत असाल तर काही औषधांच्या प्रभावानेही तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काही उपाय करता येतील. काही काळासाठी हाय फॅट, लो फायबर आहारापासून दूर राहा.

पित्ताचा त्रास होऊ लागला की डॉक्टर फायबरयुक्त आहाराचा सल्ला देतात. अशा वेळी हिरव्या पालेभाज्या, फळे आणि मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवू शकता. पपई आणि केळी खाल्ल्यानेही चांगला फायदा होतो. काही दिवस तरी हाय फॅट आणि लो फायबर आहारापासून दूर राहा. यामध्ये प्रक्रियायुक्त अन्न, मांसाहार किंवा डेअरी प्रॉडक्ट यांचा समावेश आहे. िपत्ताच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जेवणात बटरमिल्कचा वापर वाढवा. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी, एक िकंवा दोन ग्लास फ्रूट ज्यूस, भाज्यांचा रस िकंवा सूप घेऊ शकता. दिवसाची सुरुवात ज्यूस आिण रात्री झोपताना आठ ते दहा काळ्या मनुका खा. दिवसांतून ३० िमनिटे चालणे, काही वेळ व्यायाम आिण योगासने करण्याने फायदा.

व्यायाम करण्याने पचनशक्ती चांगली राहते. पोटांच्या स्नायूंची हालचाल राहते. दिवसातून ३० मिनिटे का होईना चालले पािहजे. योगासने करण्यानेही कमी वेळेत जादा फायदा होऊ शकतो. भुजंगासन किंवा कपालभारती प्राणायामने फायदा होतो. जेवणानंतर दहा मिनिटे वज्रासनात बसण्याने फायदा होतो.
-पित्तावरील काही आयुर्वेदिक औषधे- गंडहरवा हसठंडी कश्याम, शिरूविलवादी कश्याम, गंधरवा हरिथाकी चूर्ण.
डॉ. आयझॅक मठई,
अल्टरनेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट, नवी दिल्ली
myresponse@ dbcorp.in