आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Danger Water Bottle By Vaidya Vijay Kulkarni

सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दररोज प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पीत असाल तर सावधान होण्याचा महत्वाचा सल्ला नुकताच काही संशोधकांनी दिला आहे. प्लास्टिकच्या बाटलीतले, कॅनमधले किवा प्लास्टिकच्या पेल्यातले पाणी आपण सतत प्यायले तर आपला रक्तदाब वाढून आपल्याला हाय ब्लड प्रेशर चा त्रास होण्याची शक्यता आहे असे एका संशोधनात आढळून आले आहे. कोरियातील सेउल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी काही लोकांवर शास्त्रीय प्रयोग करून वरील आशयाचा नित्कर्ष काढल्याचे एका अमेरिकन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. प्लास्टिकमध्ये असलेल्या बिसफेनोल अ (Bisphenol A) या रासायनिक घटकामुळे मानवी शरीरातील रक्तदाब वाढू शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
आतापर्यंत या रसायनामुळे कॅन्सर किवा तत्सम व्याधी निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे होते. परंतु, आता या नवीन संशोधनामुळे प्लास्टिकमधील पाणी किवा अन्य कोणत्याही द्रव पदार्थाच्या सततच्या सेवनामुळे आपला रक्तदाब वाढून पुढे त्याचा परिणाम हृदयरोग निर्माण करण्यातही होऊ शकतो हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले आहे.
आरोग्य रक्षणासाठीही प्लास्टिक छोड दो
ही मोहीम सर्वत्र राबवणे काळाची गरज

आपण सर्वानी बोध घ्यावा हल्ली पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक चा वापर कमीत कमी करावा याचा प्रचार आपण सर्वत्र एकतो. परंतु पर्यावरणाबरोबरच आता आरोग्य रक्षणासाठीही प्लास्टिक छोड दो ही मोहीम सगळीकडे राबवणे ही काळाची गरज आहे. ज्या प्रमाणे अल्युमिनियमच्या भांडयात शिजवलेले अन्न किवा उकळलेला चहा, दूध, कॉफी यांचे सेवन नेहमी केल्याने आपले आरोग्य बिघडू शकते, आपली स्मरणशक्ती कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे आता प्लास्टिक बाबतीतही म्हणावे लागत आहे. प्लास्टिक चा वापर दररोज अगदी शाळेतील मुलामुलींपासून कार्यालयात किवा व्यवसायाच्या ठिकाणी जाणारे बहुतेक जन बाटली किवा वाटर बग च्या रुपाने करत असतात. त्याचबरोबर प्लास्टिक च्या पात्रात ठेवलेले पाणी प्लास्टिकच्याच पेल्याने पिण्याची सवय अनेकांना असते. त्याचबरोबर अनेक वेळा प्लास्टिकच्या बंद पिशव्यात असलेले पाणी तसेच दूधही आपण सातत्याने घेत असतो. प्रवासात बाहेर गेल्यास देखील आपण बरोबर प्लास्टिक च्या बाटलीत पाणी नेतो किवा त्या बाटलीतील पाणी विकत घेऊन पितो. हे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे की या मुळे आपण आपल्या आरोग्याची समस्या निर्माण करतो आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. प्लास्टिक चा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणतेही पेय पिण्यासाठी होणारा वापर हा त्रासदायक आहे हे लक्षात घेऊन ते टाळण्याचा आपण सर्वानीच प्रयत्न करणे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या हिताचे आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, प्लास्टीक टाळा रक्तदाब आटोक्यात ठेवा