आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी घातकच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर शरीरात चरबी जास्त असेल तर धोका राहणारच. मग भलेही तुमचे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी सामान्य असो, मात्र चरबीमुळे धोक्याची तलवार टांगती राहतेच. यासाठी 60 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय लठ्ठ व्यक्ति निरोगी असेल तर त्याला आरोग्याचा काहीच धोका नसतो हेही संशोधन करण्यात आले. मात्र हे चुकीचे आहे. टोरँटोच्या माउंट सिनाई हॉस्पिटलचे डॉ.रवी रत्नाकरम यांच्या म्हणण्यानुसार, एकदा वजन वाढले ही आरोग्याला काही अर्थच राहत नाही. त्यासाठी 10 वर्षांपर्यंत हृदयाची चाचणी घेण्यात आली. त्यांचे म्हणणे असे की, जास्त वजन असणाºया व्यक्ति तपासणीत भलेही निरोगी असोत मात्र त्यांना नेहमी धोका असतोच. हा धोका हळु-हळू वाढत जातो. त्यामुळे जास्त वजन आणि आरोग्याचा काहीच ताळमेळ नसतो.

त्यांचे म्हणणे आहे की, निरोगी दिसणाºया लठ्ठ व्यक्ति दिसतात तशा नसतात. त्या कधीही आजारी पडू शकतात. ब्रिटीश हार्ड फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा हृदयरोगाचे प्रमुख कारण आहे. संशोधन असे सांगते की लठ्ठपणा घेऊन निरोगी राहणे शक्यच नाही. सीनियर कार्डियक नर्स डॉयरिक मॅडॉक म्हणतात, लठ्ठपणा वाढूनही आपला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी सामान्य असेल तरीही आपण निरोगी राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तिचे धोके सांगण्यापेक्षा त्याच्या जीवनचर्या सुधारणेवर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे असे की, वजनाकडे लक्ष देतानाच धुम्रपान वर्ज्य, नियमित व्यायाम, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल निरोगी पातळीवर ठेवले तरच हृदय रोगापासून लांब राहणे शक्य होते.