आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा हार्मोन्स योग्य प्रकारे विकसित न झाल्यामुळे काही लोकांची उंची वाढत नाही. विशेषतः आपली उंची वाढण्यामागे सर्वात मोठे योगदान ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे 'एचजीएच' चे असते. एचजीएच पिट्युटरी ग्लँडमधून निघते. हेच कारण आहे, की योग्य प्रोटीन आणि न्युट्रिशन न मिळाल्यामुळे शरीराची वाढ खुंटते. जर तुमच्यासोबतही अशीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला उंची वाढवण्याचे काही आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत.
1. उपाय - अश्वगंधा आणि सुकलेली नागोरी या दोन्ही वनस्पतींना आयुर्वेदामध्ये शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.
सामग्री -
- २० ग्रॅम सुकलेली नागोरी
- २० ग्रॅम अश्वगंधा
- २0 ग्रॅम साखर
तयार करण्याचा विधी - सुकलेली नागोरी आणि अश्वगंधाचे मूळं बारीक करून घ्या. या चूर्णामध्ये समान मात्रेत साखर मिसळा. हे मिश्रण काचेच्या बाटलीत ठेवा.
अशा पद्धतीने करा सेवन - रात्री झोपताना दररोज दोन चमचे हे चूर्ण घ्या. त्यानंतर गाईचे दुध प्या. यामुळे उंची वाढेल तसेच तब्येत सुधारेल.
(अश्वगंधाच्या नागोरी, जवाहर, असगंद आदी 20 सुधारित जाती आहेत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.