आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : उन्हाळ्यात हे छोटे-छोटे उपाय केल्यास उजळेल चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे स्किन रफ होते. त्यामुळे या काळत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. उन्हाळ्यात चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत..

1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल.

2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका. या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल.

3. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. दररोज कमीत कमी दहा ग्लास पाणी प्यावे, कारण पर्याप्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वस्थ, चमकदार होते. जास्त पाणी प्यायल्यास कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, चेहरा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे इतर काही खास घरगुती उपाय...
बातम्या आणखी आहेत...