आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : उन्हाळ्यात अमृतफळ बेलाचे सरबत पिण्याचे 9 मोठे फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात बेल म्हणजे बिल्व फळाचे सेवन शानिरासाठी खूप लाभदायक मानले जाते. बेलाच्या विधिवत सेवनाने शरीर निरोगी आणि सुडौल बनते. बेलाचे मूळ, फांद्या, पाने, साल सर्वच्या सर्व औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. बेलात ह्रदयाला बळ आणि मेंदूला स्फूर्ती देण्याबरोबरच सात्विक शांती प्रदान करण्याचाही श्रेष्ठ गुण आहे. हे स्निग्ध, मऊ, आणि उष्ण असते. याचा गर, पाने, तसेच बियांमध्ये तेल आढळते, जे औषधी गुणांनी भरपूर असते. आज आम्ही तुम्हाला अमृतफळ बेलाचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत.

बिल्व किंवा बेलाचा अर्थ आहे : रोगान बिलती भिनत्ति इति बिल्वः |

डायबिटीजमध्ये लाभदायक
बेलामध्ये लेक्साटिव तत्वाचा स्तर जास्त प्रमाणात असतो. हे शरीरातील रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवते. शरीरात इन्सुलिन बनवण्यात सहायक आहे, ज्यामुळे डायबिटीजमध्ये आराम मिळतो.