सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत, जे सूर्योदयानंतरही बर्याच वेळानंतर अंथरुणातून बाहेर पडतात. झोपेतून उशिरा उठणे ही सवय चांगली नाही. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठणे आवश्यक आहे. ही एक प्राचीन परंपरा आहे. तसं पाहायला गेल तर काही जणांसाठी हे कठीण काम आहे, परंतु सकाळी लवकर उठल्यास स्वास्थ्य लाभासोबत लक्ष्मी आणि इतर देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. दिवसभर शरीर उर्जवान राहते. येथे जाणून घ्या, या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी आणि सकाळी कोणकोणती कामे करावीत....
सकाळी-सकाळी प्यावे असे पाणी
सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यासाठी रात्री झोपताना तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे पाणी प्यावे. या उपायाने पोटाशी संबंधित छोटेछोटे आजार
आपोआप ठीक होतील. पोट साफ राहते आणि त्वचा संबंधी आजारातून मुक्ती मिळू शकते. हा उपाय करण्यापूर्वी एखाद्या चिकित्सकाचा सल्ला अवश्य घ्यावा.
पुढे वाचा, या संदर्भातील आणखी काही खास गोष्टी...