आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चीवर नाही जमिनीवर बसून जेवण करावे, हे आहेत यामुळे होणारे मोठे फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये अनेक प्रथा अशा आहेत, ज्यांचा संबंध मनुष्याच्या आरोग्याशी आहे. यामधीलच एक प्रथा जमिनीवर बसून जेवण करण्याची आहे. आजही ज्या भारतीय घरांमध्ये जेवण पारंपारिक पद्धतीने वाढते जाते, ते जमिनीवर बसून अन्न ग्रहण करतात.

सध्याच्या काळात अनेक लोक जमिनीवर बसून जेवण करत नाहीत तर काही लोक टीव्हीसमोर बसून किंवा पलंगावर बसून जेवण करणे पसंत करतात. तुम्हाला हे आरामदायक वाटत असेल परंतु आरोग्यासाठी ही सवय ठीक नाही. आपल्या पूर्वजांनी निश्चितपणे खूप विचार करून जमिनीवर सुखासनात बसून जेवण्याचे विधान सांगितले आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. येथे जाणून घ्या, या सवयीचे खास आणि महत्त्वपूर्ण फायदे...

वजन नियंत्रणात राहते - जेव्हा तुम्ही सुखासनात बसता, तेव्हा तुमचा मेंदू शांत होतो. तुमच्या व्यवस्थितपणे जेवणावर लक्ष केंद्रित करू शकता. डायनिंग टेबलवर जेवण न करता सुखासनात बसून केल्याने खाण्याची गती संथ होते. यामुळे पोट आणि मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. अशाप्रकारे सुखासनात बसून जेवण केल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करण्यापासून दूर राहू शकता. जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, जमिनीवर बसून जेवण केल्याने होणारे इतर काही खास फायदे....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)