तुम्हाला आठवतंय का, यापूर्वी तुम्ही कधी स्वतःच्या श्वसन क्रियेकडे लक्ष दिले होते? जर नसेल दिले तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे की, श्वासोश्वास
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. यामुळे ही क्रिया व्यवस्थितपणे पूर्ण होणे आवश्यक आहे. श्वसन क्रिया योग्य ठेवण्यासाठी सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे नियमित प्राणायाम. प्राणायाम करण्याचे विविध फायदे आहेत.