आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या तिशीनंतर आवश्यक असते कॅल्शियम, फायदेशीर ठरतील 12 TIPS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयासोबतच आपले डायजेशन कमकुवत होते. खासकरुन 30 वर्ष पार झाल्यानंतर शरीर आहारातील कॅल्शियम सहज अब्जॉर्ब करु शकत नाही. अशावेळी कॅल्शियमच्या कमतरतेचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त अनहेल्दी डायट आणि जास्त शुगरी फूड खाल्ल्यामुळेही बॉडीमध्ये कॅल्शियमची कमरता होऊ शकते. यासोबतच प्रेग्नेंसीच्या काळात बेबीची बोन डेव्हलपमेंट प्रोसेसच्या काळात महिलांच्या शरीरातील कॅल्शियम लेव्हल कमी होते. तसेच बाळाला दूध पाजणा-या महिलांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीराच्या फंक्शंसवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे हाडे कमकुवत होतात. फॅक्चर होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. मसल्स, कंबर आणि जॉइंटमध्ये प्रॉब्लम्स येतात. केस ड्राय आणि निर्जिव होतात. अशक्तपणा येतो, दातांच्या पिवळेपणाची समस्या होऊ शकते.

ऑर्थोपिडिक आणि पेन फिजिशियन डॉ. रुपेश जैन म्हणतात की, 30 व्या वर्षानंतर आपल्या डायटमध्ये कॅल्शियम रिच फूड वाढवून याची कमतरता टाळता येऊ शकते. याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता वाढवण्यात मदत करु शकतात.
जाणुन घ्या अशाच काही सोप्या पध्दतींविषयी सविस्तर माहिती...