आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवचिक शरीरासाठी नियमित करा हे योगासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुजंगासनचा शरीराच्या स्नायूंवर मोठा परिणाम होतो. दमा आणि वायुदोषांवर याचा विशेष प्रभाव पडतो. तसेच यामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो.

लक्ष द्या
शरीर झटक्याने उचलू नका. नाभी किंवा नाभीच्या खालचा भाग कोणत्याही परिस्थितीत उचलू नका. हातांवर कमी वजन द्या खांद्यावर वजन नियंत्रित करा.
कृती
- जमिनीवर पोटावर झोपा, दोन्ही पाय जोडून घ्या, पायाची बोटे मागे, तळपाय आकाशाच्या दिशेने हात, अंगठा काखेला लागून मागच्या दिशेला बोटे जोडलेली, तळहात आकाशाकडे आणि चेहरा जमिनीला लावून ठेवा.
- हात कोपऱ्यांपासून वाकवा आणि तळहात खांद्यापासून आपल्या छातीजवळ आणा.
- माथा पुढे टेकवा, हनुवटी जमिनीवर ठेवा, नजर समोर ठेवा.
- हनुवटी उचला, डोके मागच्या दिशेने शक्य तेवढे झुकवा, शरीराच्या नाभीच्या वरचा भाग वर उचला, लक्षात ठेवा नाभी उचलू नका, केवळ नाभीपर्यंतचे शरीरच उचला.
- थोडा वेळ याच स्थितीत राहा. पुन्हा हळूहळू नाभीच्या वरचा भाग खाली ठेवा. छाती, खांदा, हनुवटी आणि शेवटी मान खाली आणा आणि माथा जमिनीवर ठेकवा.
- आता हात सैल करून जांघेकडे घेऊन जा.
रत्नेश पांडे
योग चिकित्सक, भोपाळ