Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | diabetes patient tips

PHOTOS : डायबेटीजच्या रुग्णांनी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे

दिव्य मराठी | Update - Jan 24, 2013, 11:38 AM IST

मेंदूला स्वत:च्या कार्यासाठी ग्लुकोजची गरज भासत असते.

 • diabetes patient tips

  मेंदूला स्वत:च्या कार्यासाठी ग्लुकोजची गरज भासत असते. सर्वसामान्यपणे रक्तात ग्लुकोज म्हणजे साखरेचे प्रमाण वाढणे धोकादायक मानले जाते. मधुमेह असणार्‍यांना शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु रक्तातील साखर वाढण्याबरोबर ती कमी होणेसुद्धा धोकादायक असते.

 • diabetes patient tips

  मधुमेहींनी राहावे सतर्क - मधुमेही रुग्णांच्या शरीरात लो ब्लड शुगर होण्यास काही औषधेसुद्धा कारणीभूत असतात. ही औषधे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात. म्हणून मधुमेहींना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे या दोन्ही गोष्टींची नियमित काळजी घ्यावी लागते. शुगर लेव्हलमध्ये सातत्य ठेवण्यासाठी वेळेवर जेवण करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कोणत्या वेळी आणि काय खातो यावरसुद्धा साखरेचे प्रमाण अवलंबून असते.

 • diabetes patient tips

  का कमी होते शुगर लेव्हल ?

  जास्त प्रमाणात इन्सुलिन घेणे, योग्य वेळी इन्सुलिनचा डोस न घेणे

 • diabetes patient tips

  वेळेवर जेवण किंवा स्नॅक्स न घेणे किंवा कमी प्रमाणात खाणे

 • diabetes patient tips

  जास्त व्यायाम करणे, काही न खाता व्यायाम करणे

 • diabetes patient tips

  अनेक वेळा त्वचेच्या फॅट लेअरऐवजी स्नायूवर इंजेक्शन दिल्यानेसुद्धा साखरेचा स्तर कमी होतो.

 • diabetes patient tips

  इशारा पातळी  - ब्लड ग्लुकोज लेव्हलचे तात्पर्य रक्तात ग्लुकोजचे आदर्श प्रमाण होय. जेव्हा हे प्रमाण निश्चित प्रमाणापेक्षा कमी होते तेव्हा त्याला हायपोग्लासेमिया म्हणतात. मधुमेहीच्या रक्तात ग्लुकोजचे प्रमाण 60 ते 65 मि.ग्रा. प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असू नये. हे प्रमाण कमी झाल्यास रुग्णासाठी धोकादायक असते.

 • diabetes patient tips

  लगेच अंघोळ नको - अनेकदा ब्लड स्ट्रीमकडून इन्सुलिन अतिजलदपणे शोषून घेतले जाते. याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. (उदा. इन्सुलिन इंजेक्शन घेतल्यानंतर लगेच गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर केल्याने रक्तदाब वाढतो. अशावेळी इन्सुलिन जलदगतीने शोषले जाते.

Trending