आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम करताना घ्या अल्प विश्रांती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपर बॉडीचे (शरीराचा वरील भाग) वजन कमी करणे फारच आव्हानात्मक असते. यासाठी टू-फोल्ड शेड्यूलचा अवलंब करावा. यात आठवड्यातून पाच दिवस 45 ते 60 मिनिटे कार्डियो एक्झरसाइज करावा. या वेळी डाएटकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अपर बॉडीवर केंद्रित व्यायामशैलीचा अवलंब केल्याने फायदाच होईल. इलेप्टिकल ट्रेनर आणि सायकलमुळे शरीर टोनअप होते. अशावेळी बायसेप कर्ल, ट्रायसेप एक्सटेन्शन, शोल्डर प्रेस, चेस्ट प्रेस आणि पुश-अप लाभदायी ठरतात. ज्या प्रशिक्षकाला व्यायामाची परिपूर्ण माहिती आहे, अशा जिमला प्राधान्य द्या. पायाला वजन लावून पोहणे तसेच वेगाने चालण्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. त्याचा नियमित सराव केल्याने शरीर सुदृढ आणि बळकट होईल. मात्र, हा परिणाम लवकर दिसण्यासाठी हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग (एचआयआयटी)या नियमित व्यायाम पद्धतीचा अंगीकार करा. यात अल्प विश्रांती घेत तीव्र व्यायाम करावा लागतो.

उदाहरणार्थ, इलेप्टिकल ट्रेनर वेगाने 20 सेकंद चालवा आणि 10 सेकंद विश्रांती घ्या. हा सराव पुन्हा पुन्हा करा. असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. जसजशी चरबी कमी होईल त्याप्रमाणे व्यायामाची शैली बदला. शरीराच्या वरच्या भागातील स्नायूंच्या बळकटीसाठी डंब बेल्स किंवा रेजिस्टेन्स ट्यूबसह व्यायाम केल्यास चांगले परिणाम दिसतील.