Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Dont Drink Sugarcane Juice In Market

ऊसाचा रस पिण्यापुर्वी जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा पडू शकता आजारी

अविनाश रावत | Apr 20, 2017, 12:31 PM IST

तुम्हाला जर असे वाटत असेल की ऊसाचा रस शरीरासाठी फायदेशीर ठरतो तर हा तुमचा गैरसमज आहे. वास्तव असे आहे की, ऊसाचा रस आणि बर्फ दोघांचेही गुणधर्म वेगवेगळे आहेत. तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगली तर आजारांपासून दूर राहू शकता. ऊसाचा रस पिण्यापुर्वी तो कशाप्रकारे तयार होतो हे पाहून घ्या.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसाची पूर्णपणे स्वच्छता केली जात नाही. उसावर शेतातील माती लागेल असते. जे लिंबू मिसळले जाते त्यावर डाग पडलेले असतात. त्यामधील बिया काढलेल्या नसतात. पुदिना धुतलेला नसतो. रस निघून ज्या पत्र्यावर पडतो तो हाताने पातेल्यात ढकलला जातो. ते हात स्वच्छ असतात की नाही हे कोणीही चेक करत नाही. त्याच हातांनी ऊस पकडला जातो, जनरेटर सुरु केले जाते आणि येथूनच आजाराचे सर्व लक्षण सुरु होतात.

अस्वच्छ ऊसाचा रस प्यायल्याने हे आजार होतात-
अशा रसामुळे हेपिटायटिस ए, डायरिया आणि पोटाचे आजार होतात. वनस्पतिशास्त्री डॉ. अविनाश पांड्येय यांच्यानुसार ऊसावर जर लालसरपणा असेल तर शपथ घ्या की तुम्ही या ऊसाचा रस पिणार नाहीत. हे एक प्रकारचे फंगस(बुरशी) असून ऊसाच्या रसाला लाल करते. यामुळे रसाचा गोडवा कमी होतो. असा ऊस स्वस्त मिळतो आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो.

पुढे वाचा, ऊसाचा रस पिण्यासाठी गेल्यावर काय करावे...

Next Article

Recommended