आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEAUTY TIPS : मेकअप करताना करू नका या साध्या चुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)
मेकअप करताना काही साध्या चुका होऊ शकतात. लिपस्टिक ओठांवर जास्त काळ टिकून न राहणे किंवा आयलायनर डोळ्यांच्या बऱ्याच खाली लागणे अशा चुका सहज घडत असतात. खाली काही टिप्स दिलेल्या आहेत, ज्यामुळे आपण अशा चुका टाळू शकता.
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक मुलिला वाटत असते. यासाठी ती बाजारपेठेतून महागडे प्रोडक्ट विकत घेताना दिसून येते. परंतु, चुकीच्या पद्धतीने मेकअप लावले तर त्याचा परिणाम जास्त काळ टिकून राहत नाही. त्यामुळे काही मेकअप टिप्स मेकअपसह लुक्स बदलतात.
पेन्सिल आयलायनरचा जेल करा- माचिस किंवा लाइटनरच्या वर ब्लॅक, ग्रीन किंवा कोणत्याही रंगाच्या लायनरला काही सेकंदांसाठी धरा. त्यानंतर त्याला 15 सेकंद थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात बदल होताना दिसून येईल. आता या जेल आयलायनरचा उपयोग करा.
आयशाडोला हायलाईट करण्यासाठी व्हाइट शेड- कोणत्याही शेडला डोळ्यांवर हायलाईट करण्यासाठी व्हाइट पेन्सिलला डोळ्यांवर लावा. असे केल्याने कोणताही रंग अधिक शोभून दिसेल.
चमच्याने विंग्ड लायनर- चमच्याच्या हॅंडलला डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूस पकडा. कॅट आय करण्यासाठी आधी स्ट्रेट लाईन काढा. त्यानंतर चमच्याने डोळे झाकून घ्या. चमच्याचा गोल आकार यासाठी फायदेशीर ठरतो.
असा मिळेल स्मोकी इफेक्ट- डोळ्यांच्या कोपऱ्यात चेक साइन करा. त्यानंतर त्याला बोटांनी पसरवल्यावर स्मोकी इफेक्ट मिळेल.
पुढील स्लाईडवर वाचा आणखी काही ब्युटी टिप्स...